spot_img
अहमदनगरमनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

spot_img

सुनील चोभे | नगर सह्याद्री
आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच पक्षांकडून जोर बैठका घेतल्या जात आहेत. त्यात भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने आघाडी घेतली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जात आहे.

दरम्यान या पूवच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानेही सरकारला निवडणुकीसाठीची प्रभाग रचना, मतदारयाद्या, आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील इव्हीएमची माहिती मागविली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेत. पण त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असे यापूवच जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात काही ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुतीही स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून स्वबळाचीही तयारी
अहिल्यानगर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून तयारी चालू आहे. दिग्गज मातब्बरांना आपल्या पक्षात घेत पक्ष बळकट केला जात आहे. बैठकांमधून स्वबळावर लढण्यासाठीचीही तयारी केली जात आहे. त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपने शहर जिल्हाध्यक्ष पदाची माळ अनिल मोहिते यांच्या गळ्यात टाकत मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षवाढीसह महापालिका, जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश मोहिते यांना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील राजकीय, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. पक्षामधील मतभेद बाजूला ठेवून नवीन फळी तयार करा. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा करण्यासाठी काम करण्याच्या सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने मेळावा घेऊन महापालिका, जिल्हा परिषदेसाठी रणशिंग फुंकले आहे.

महाविकास आघाडीत सूर जुळेनात!
अहिल्यानगर जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, 14 पंचायत समित्या, 09 नगर पालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगले यश मिळाले; परंतु विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची वाताहात झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजूनही दिग्गज नेते भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये अद्यापही सूर जुळलेले दिसून येत नाहीत. अहिल्यानगर शहरात उबाठाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी सहकाऱ्यांना सोबत घेत तयारी चालविली आहे. दुसरीकडे शहरात काँग्रेसला अद्याप पदाधिकारीच मिळालेला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...

नेवाशाचा विजय नगरमध्ये करायचा तसलं काम; पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री कोतवाली पोलीसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत सराईत चोरट्यास...