spot_img
अहमदनगरविद्यार्थ्यांचा क्रुझर गाडीला ट्रक धडकला; 'ईतक्या' जणांचा मृत्यू, अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील घटना...

विद्यार्थ्यांचा क्रुझर गाडीला ट्रक धडकला; ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू, अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील घटना…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे भीषण अपघात घडला. अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावर ट्रकला क्रुझर गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ११ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ५.१५ च्या सुमारास घडली.

या अपघातात प्रथमेश तेली (रा. बोदवड, जि. जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या वृषभ सोनवणे (रा. बोदवड) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी ११ विद्यार्थ्यांवर नेवासा फाटा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीतील १३ विद्यार्थी पुण्याच्या गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते बोदवडकडे परतत असताना अपघात घडला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व ॲम्बुलन्सच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विकासकामांच्या माध्यमातून केडगावला नवी दिशा दिली:आ. जगताप

लिंक रोड परिसरातील सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- केडगाव हे शहराचे सर्वात...

‌‘गोरेश्वर‌’साठी 48 टक्के मतदान! बाबासाहेब तांबे की बाजीराव पानमंद?, निकालाकडे पारनेरकरांचे लक्ष

पारनेर | नगर सह्याद्री गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 चे मतदान...

जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची लागली वर्णी?, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील अगग्रण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षपदी...

कर्जुले हर्या, कासारेत ढगफुटीसदृश पाऊस; पहा, कुठे काय घडलं?

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या आणि कासारे परिसरात रविवारी दि. 8 जून...