Maharashtra News: एका अनाथाश्रमातून ५ मुली पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचही मुली अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या पाचही मुलींचा शोध घेत आहेत.
२७ मार्चला नेहमीप्रमाणे दिनचर्या पूर्ण करून साडेअकरा वाजता सर्व झोपले होते. त्यानंतर २८ मार्चच्या मध्यरात्री ५ मुली एकापाठोपाठ वॉशरूमला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाही म्हणून नाईट वॉचमनने, सिस्टर म्हणून काम करणाऱ्या महिलेने बाथरूम तपासले. तर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून या मुली पळून गेल्याचे दिसून आले.
अनाथाश्रमातील सिस्टर, वॉचमन या सर्वांनी सगळीकडे शोधाशोध केली पण या मुली कुठेच सापडल्या नाही. पाचही मुली १५ ते १७ वयोगटातील आहे. मुंबईच्या अंधेरी परीसरातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सेंट कॅथरीन अनाथाश्रमामध्ये सदरची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुलींचा शोध सुरू केला आहे.