भाजपा मध्य मंडलाच्या वतीने नगर शहरातून तिरंगा रॅलीस उस्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तिरंगा रॅलीमुळे शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले आहे. देशाच्या रक्षणाकरीता प्रतिकूल परीस्थितीतही जवान कठोर संघर्ष करतात. तिरंगा रॅलीतून शहीद जवानाचे स्मरण होत आहे. त्यांनी केलेल्या शौर्याचे या माध्यमातून महत्व अधोरेखित होत आहे. त्यांच्या त्याग, समर्पणातून पुढच्या पिढीला एक प्रेरणा मिळते असे प्रतिपादन भाजपा माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
भाजपा मध्य मंडलाच्या वतीने नगर शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा संयोजक सुनिल रामदासी, ज्येष्ठ माजी शहराध्यक्ष अभय आगरकर, ज्येष्ठ पदाधिकारी वसंत लोढा, महिला प्रदेश चिटणीस गीता गिल्डा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. प्रिया जानवे, बाबासाहेब सानप, सचिन पारखी, मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, प्रशांत मुथ्था, सावेडी मंडल अध्यक्ष सीए राजेंद्र काळे, अमोल निस्ताने, कैलास गर्जे, प्रकाश जोशी, महेश गुगळे, लक्ष्मीकांत तिवारी, निरज राठोड, संतोष गांधी, सुहास पाथरकर, संजय ढोणे, अनिल निकम, दत्ता गाडळकर, दर्शन करमाळकर, रूदेश अंबाडे, उत्कर्ष गिते, दिलावर पठाण, देवेंद्र बंब, मुकुल गंधे, महेश गुगळे, कालिंदी केसकर, सुरेखा ज़ंगम, रेणुका करंदीकर, ज्योती दांडगे, श्वेता झोड, सविता कोटा, राखी आहेर, उज्वला भांगे, श्वेता पंधाडे, प्रतिभा पेंडसे, लीला अग्रवाल, बाळासाहेब भुजबळ, दिपक देहरेकर, सुरेश लालबगे, हेमंत पवार, सुनील तावरे, संजय ढोणे, राहुल जामगांवकर, मिनिनाथ मैड, ओंकार लेंडकर, रेखा मैड, हर्षल जोशी, कावेरी घोरपडे, सुनिल सकट, पंडित वाघमारे, अक्षय धवळे, अंजिक्य गुरवे, सागर शिंदे, सुहास पाथरकर, पियुष तावरे, गोपाल वर्मा, सरचिटणीस महेश नामदे व मेहर इंग्लिश स्कूल चे विद्याथ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहर इंग्लीश स्कूलमधून या रॅलीचा शुभारंभ झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर तिरंगा घेउन भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत होते. रॅली ज्या मार्गाने जात होती त्या मार्गावर नागरिकांनी गद करत फुलांचा वर्षाव करत होती. यावेळी मेहर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक यात सहभागी झाले होते. पटवधन चौक, लक्ष्मी कारंजा,कापडबाजार, आनंदी बाजार,तेलीखुंट, चितळेरोड या भागातून ही रॅली काढण्यात आली होती