नंदूरबार / नगर सह्याद्री –
नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची तोडफोड झालीय. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झालेत.
दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि काही आंदोलक जखमी झालेत. पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि उपद्रव्यांमध्ये चकमक घडली. काही उपद्रव्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीच्या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्या आले. दरम्यान जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आदिवासींचा मूक मोर्चा निघाला होता,आंदोलक निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्यावेळी काही उपद्रव्यांनी कार्यालयातील परिसरातील वाहनांची तोडफोड केली पोलिसांवर दगडफेक केली.
वाहनांची तोडफोड, आंदोलनाला हिंसक वळण
मिळालेल्या माहितीनुसार मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी हजारो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमा झाले आहेत. या वेळी आंदोलकांच्या हातात अनेक फलके होती. याच आंदोलनाला आचानक हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड केली. काही प्रमाणात गडफेक झाल्याचीही घटना घडली. या घटनेनंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. यामुळे काही काळासाठी नंदूरबार जिल्हाधिकारी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
आंदोलनात पोलीसही जखमी, रुग्णालयात उपचारासाठी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली आहे. सोबतच आंदोलनलाा हिंसक वळण लागल्यामुळे काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या आंदोलनात वीस ते बावीस हजार आंदोलक सामील झाले होते. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनासोबतच काही आंदोलकांनादेखील इजा झाली आहे.
प्रशासन काय निर्णय घेणार?
दरम्यान, आता पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यामुळे हे प्रकरण जास्तच तापण्याची शक्यता आहे. आदिवासी संघटना नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच आंदोलकांची दखल घेऊन प्रशासन आदिवासी तरुणाच्या मृत्यूची चौकशी करणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.