spot_img
महाराष्ट्रट्रॅव्हलरला भीषण धडक; सात जणांचा जागीच मृत्यू, कुठे घडली घटना?

ट्रॅव्हलरला भीषण धडक; सात जणांचा जागीच मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

मध्यप्रदेश | वृत्तसंस्था
महाकुंभ मेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी कारही ट्रकमध्ये घुसली.

अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. तर वाहनं बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक जबलपूरहून कटनीच्या दिशेनेजात होता. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिहोरातील मोहला बरगी गावाजवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारला धडक देऊन ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनवर पोहोचला. तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रॅव्हलरला धडक दिली.

प्रयागराजहून आंध्र प्रदेशला परतण़ाऱ्या ट्रॅव्हलरला धडक बसून जागीच सात जणांचा मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रक आणि ट्रॅव्हलरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालय आणि सिहोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. अपघातात मृत्यू झालेले आंध्र प्रदेशचे असल्याची प्राथमिक माहिती समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...