पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. १६ पोलीस निरीक्षकांसह ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १० पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी रात्री बदल्यांचे हे आदेश काढले.
नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या फेरबदलात सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे यांची बदली अहमदनगर नियंत्रण कक्षातून शेवगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे यांची बदली शेवगाव पोलीस ठाण्यातून घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान हरिभाऊ मथुरे यांची बदली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब शांताराम महाजन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील. भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधव जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतील. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची बदली शिर्डीच्या वाहतूक नियंत्रण शाखेत करण्यात आली आहे.
शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस निरीक्षक राजेंद्र जगन्नाथ इंगळे यांची बदली ए. एच. टी. यु. अहमदनगर या शाखेकडे करण्यात आली आहे. तर ए. एच. टी. यु. शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकुमार विष्णू दुधाळ यांची बदली पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची बदली अहमदनगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे करण्यात आली.पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस निरीक्षक असलेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे आता अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मोहन बोरसे अकोले पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक असतील. अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची देखील बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. दरम्यान यांच्यासह नगर जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांमध्ये समावेश आहे.