spot_img
अहमदनगरविधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश लंके यांनी हंगा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीतील अनुभव, ईव्हीएम वाद, गद्दारीचा मुद्दा आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, शिवाजीराव जाधव, विकास रोहोकले, अशोक रोहोकले, ॲड. राहुल झावरे, सचिन पठारे, बाळासाहेब खिलारी, रवींद्र राजदेव, प्रकाश गाजरे, जितेश सरडे, शिवाजी होळकर, गणेश साठे, अजय लामखडे, बाबासाहेब काळे, पोपटराव पुंड, पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, राजू शेख, योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, डॉ. बाळासाहेब कावरे, दादा शेटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण ताकदीने लढवणार आहोत, आणि जिंकणारही आहोत. असे सुरूवातीला ठाम शब्दात खा. लंके म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितले की आपला विजय निश्चित असला तरी फाजील आत्मविश्वास नको. प्रत्येक मतदारापर्यंत संघटीत पध्दतीने पोहोचा. प्रत्येक बूथ मजबूत करा. कारण मतदार हाच आपला खरा किल्ला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपलीच ताकद पुरेशी असल्याचे ते म्हणाले.

खा. लंके यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळयाची उदाहरणे देत आठवण करून दिली. या छोट्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मॅनेज होणार नाही. परंतु मोठया निवडणुकीत आपण कसा निसटता पराभव पाहिला हे राज्यभर चर्चेत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर गेला. यावरून ईव्हीएम घोटाळयाची गंभीरता लक्षात येते. पण या निवडणुकीत मतपेटीला हात लावता येणार नाही. त्यामुळे आपल्या मेहनतीचा थेट फायदा आपल्यालाच मिळेल असे ते ठामपणे म्हणाले.

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळेल
विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असा कुणीही भ्रम बाळगू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल.काही लोक चुकून किंवा मध्यस्ती करून माफ करा असा संदेश पाठवत आहेत, पण निष्ठा ही एकदाच सिद्ध करायची गोष्ट असते. नीलेश लंके प्रतिष्ठानचा परिवार सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरं जाईल, त्यामुळे आम्हाला कोणाच्या दारात जाण्याची गरज नाही, अशी ठाम भूमिका खा. लंके यांनी मांडली.

नागरिकांसाठी दर सोमवारी जनता दरबार
पारनेर-नगर मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी दर सोमवारी पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात दिवसभर जनता दरबार आयोजित करून उपस्थित राहण्याची घोषणा खा. नीलेश लंके यांनी केली. या दरबारात नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ तोडगा काढण्यावर भर दिला जाईल. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत केले.

महायुती सरकारवर जनता नाराज: खा. लंके
खा. नीलेश लंके यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारवर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या सभांना लोक उपस्थित राहत नाहीत, तर आपल्या एका संदेशावर हजारो कार्यकर्ते जमतात आणि कार्यक्रमस्थळी बसायलाही जागा उरत नाही, असे ते म्हणाले. हीच आपली खरी ताकद आणि हीच आपली खरी संपत्ती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...

मनपा प्रभाग रचनेवर ४६ हरकती दाखल; राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव; कोणी केला आरोप, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहमदनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर...