अहिल्यानगर पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग द्वारे धडक कारवाई
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर पोलीस दलाच्या तोफखाना पोस्टे हद्दीत, शहर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. जगदीश भांबळ आणि त्यांच्या अंमलदारांनी रामवाडी, गोकुळवाडी, आणि सर्जेपुरा परिसरात पायी पेट्रोलिंग करून मोठी मोहीम राबवली. या विशेष पेट्रोलिंग दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या आणि बेकायदेशीरपणे वाहने चालवणार्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
मोटार वाहन कायदा अंतर्गत: १६ केसेस दाखल करण्यात आल्या, ज्यातून १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ध्वनी प्रदूषण करणार्या वाहनांवर कारवाई: दोन बुलेट दुचाकींवरून ममॉडिफाय सायलेंसर काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदी: तपासणीसाठी एकूण ४४ वाहने थांबवून त्यांची कसून तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, या कारवाईत संबंधित अल्पवयीन चालकांचे नाव किंवा पत्ता उघड न करता, त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.



