पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश
अहमदनगर । नगर सहयाद्री:-
११ ऑगस्ट २०२४ – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात उद्या, १२ ऑगस्ट २०२४ रोजी शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये २५ ते ३० हजार मराठा समर्थक येण्याची शक्यता असून, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
शहरातील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक व पादचारी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रॅलीच्या मार्गावर “नो व्हेईकल झोन” (वाहन विरहीत क्षेत्र) घोषित केला आहे. हे नियमन १२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत लागू असेल.
नो व्हेईकल झोन मार्ग:
– इम्पेरियल चौक-माळीवाडा-पंचपीर चावडी-तख्ती दरवाजा-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट-चितळे रोड- चौपाटी कारंजा
पर्यायी वाहतूक मार्ग:
तसेच इम्पेरियल चौकाकडे दोन्ही बाजुने येणारी सर्व प्रकारची वाहने/वाहतुक ही खालील मार्गाने जातील
१)कायनेटीक चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
कायनेटीक चौक शिल्पा गार्डन समोरुन उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
२)पाथर्डी रोडने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
जीपीओ चौक बांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील. अथवा/जीपीओ चौक कोठला एसपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
३)सोलापुर व जामखेड कडुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
चांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील अथवा / चांदणी चौक जीपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
४)एसपीओ चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
एसपीओ चौक कोठला उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
हा आदेश शासकीय वाहने, अॅब्युलन्स, फायर ब्रिगेड, रॅलीमधील परवानगी दिलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.रक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.