spot_img
अहमदनगरसंगमनेर शहरात पारंपारिक वादकांचा शुक्रवारी महामेळा; आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

संगमनेर शहरात पारंपारिक वादकांचा शुक्रवारी महामेळा; आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आय लव्ह संगमनेर’ या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून संगमनेर शहरात पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या स्थानिक कलाकारांचा महामेळा आणि महावादन सोहळा शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 दरम्यान संगमनेर बस स्थानकासमोर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

अधिक माहिती देतांना आमदार तांबे म्हणाले, संगमनेर तालुक्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यवृंदात स्थानिक कलाकारांचा सहभाग राज्यभर गाजत आहे. अशा कलाकारांना व्यासपीठ मिळावे, म्हणून महावादनाचे आयोजन करण्यात आले आहे. महामेळाव्यात ‘तांडव’, ‘हिंदू राजा’, ‘छावा’, ‘एकलव्य’, ‘रुद्र’ या ढोल आणि झांज पथकांचा समावेश असून 350 पेक्षा अधिक वादक या भव्य महावादनात सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाच्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संगमनेरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महावादनाचा सोहळा होत असून तो राज्यातील इतर शहरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे मत डॉ. मैथिलीताई तांबे यांनी व्यक्त केले. या निमित्ताने शहरातील नागरिक, युवक, महिला व सर्वच गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक आणि सहभागी वाद्यपथकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...