spot_img
अहमदनगरव्यापारी, व्यावसायिक वैतागले! 'तो' निर्णय रद्द करा; 'यांनी' दिले मंत्री विखे पाटील...

व्यापारी, व्यावसायिक वैतागले! ‘तो’ निर्णय रद्द करा; ‘यांनी’ दिले मंत्री विखे पाटील यांना निवेदन

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगरच्या बाजारपेठेत नवीन पे ॲण्ड पार्क धोरण बाजारपेठ उद्ध्वस्त करणारे ठरेल. त्यामुळे सदर निर्णय रद्द करण्याचे आदेश देऊन अतिक्रमणांबाबतही लवकर कार्यवाही करावी अशी मागणी भाजप व वंदे मातरम्‌‍ युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देऊन केली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेने शहर व उपनगरांत वाहनांसाठी पे ॲण्ड पार्क धोरण राबविण्याचे ठरविले आहे.

यासाठी विविध जागाही निश्चित करून दरपत्रकही तयार करण्यात आलेले आहे. मात्र या निर्णयाची शहरातील मुख्य बाजारपेठेत अंमलबजावणी केल्यास बाजारपेठेतील अर्थकारणावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. आधीच व्यापारी, व्यावसायिक बाजारपेठेत काही बेकायदा अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तींना वैतागले आहेत, त्यात या पे ॲण्ड पार्कच्या निर्णयामुळे त्यांच्या त्रासात आणखीनच वाढ होणार आहे, तेव्हा हा निर्णय रद्द करावा असे व्यापाऱ्यांनी निवेदात म्हटले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना वंदे मातरम्‌‍ युवा प्रतिष्ठानचे महावीर कांकरिया, भाजपचे सचिन पारखी, प्रशांत मुथा, व्यापारी महासंघाचे ईश्वर बोरा, तेजस डहाळे, प्रतीक बोगावत, पवन इथानी, भैय्या भांडेकर, दीपक देहरेकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कापडबाजार, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, नवीपेठ, शहाजी रोड या परिसरात शहरासह जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी येत असतात. मुळातच या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. अतिक्रमणांची समस्या आहे.

आधीच ग्राहक बाजारपेठेत येताना त्रस्त असतात. त्यात आता वाहन लावण्यासाठी पैसे मोजायचे असा भुर्दंड ग्राहक सहन करणार नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांच्या व्यवसायावर होऊ शकतो. आधीच अनेक व्यापारी, दुकानदारांनी उपनगरांमध्ये आपापली दुकाने स्थलांतरित केली आहेत. मोठ मोठे शोरूम, मॉल्स सावेडी, केडगाव उपनगरांत उभे राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील ग्राहक आधीच कमी झालेला आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना शहरातील मुख्य बाजारपेठ जवळ पडत असल्याने ग्राहक येतात. पे ॲण्ड पार्कमुळे ग्राहकांना वाहन लावण्यासाठी तासाला पैसे द्यावे लागणार आहेत. यातून मोठा भुर्दंंड ग्राहकांच्या खिशाला बसेल.

महापालिका प्रशासनाने व्यापारी वर्गाशी चर्चा करून असा महत्त्वाचा निर्णय घेणे अपेक्षित होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठ वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाने निदान बाजारपेठेत तरी पे ॲण्ड पार्क धोरणाची अंमलबजावणी करू नये असे निवेदनात म्हटले आहे. अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नावरून व्यापारी वर्गाला दादागिरी, मारहाणीचे प्रकार घडतात. त्यालाही पायबंद बसवावा असे निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयाची तातडीने दखल घेत महानगरपालिकेसह संबंधितांना सूचना दिल्याचे महावीर कांकरिया यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...