Accident News: शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
हिंगोली- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव येथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या. सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या त्यावेळी अचानक अपघात झाला. ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
सकाळी ७ वाजता ही घटना घडली. २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ८ जण विहिरीमध्ये बुडाले असून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोलीसह नांदेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टर मध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही