spot_img
ब्रेकिंगमहिलेच्या मृतदेहावर अत्याचार! शहरात अंगाचा थरकाप उडवणारी घटना...

महिलेच्या मृतदेहावर अत्याचार! शहरात अंगाचा थरकाप उडवणारी घटना…

spot_img

crime News: महिलेची हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेहावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी खुनासह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची मंगळवार, ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आणि मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. महिलेने आरोपीला शरीरसंबंधास नकार दिला, त्यामुळे रागाच्या भरात त्याने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या अंगावर कपडे घालून आरोपी पसार झाला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले.

मृत महिला ही मूळची मध्यप्रदेशची आहे. कामाच्या शोधात ६ वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली होती. महिलेचा पती ढाब्यावर आचारी म्हणून काम करतो, तर मुलगी सातवीला आहे. आचारी पती सकाळी कामावर गेल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच घरी येतो. मृत महिलेला दारूचे व्यसन होते, त्यामुळे येथील दोन-चार दारूड्या मुलासोबत तिची ओळख झाली होती. आरोपीची अन् मृत महिलेची ओळख झाली, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.

दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते वारंवार भेटायचे. ते पुन्हा भेटले दोघांनी दारु ढोसली आणि जेवण केले. नशेत असणाऱ्या आरोपीने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पण त्या महिलेने नकार दिला. संतापलेल्या आरोपीने गळा दाबून तिचा खून केला. दारूच्या नशेत त्याने मृतदेहासोबत बलात्कार केला अन् पळ काढला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सख्खा भाऊ पक्का वैरी!, मोठ्या भावानं धाकट्या भावाचा गळा घोटला!,’धक्कादायक’ वास्तव समोर..

Crime News: सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस...

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...