spot_img
अहमदनगरयात्रेत आलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार! अहमदनगरमधील घटना

यात्रेत आलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार! अहमदनगरमधील घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरेगाव येथील यात्रेसाठी आलेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राहाता तालुक्यातील ही विद्यार्थीनी सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे यात्रेनिमित्त आली होती. त्यावेळी शिर्डी येथील बस स्थानकावर तिची ओळख दिनेश बाळासाहेब जाधव (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याच्याशी झाली. दिनेशने विद्यार्थिनीला गोड बोलून तुझ्याशी लग्न करील, अशी फूस लावली आणि रात्र फार झाली असल्याचे सांगून तिला घरी नेले.

त्यानंतर दिनेशने विद्यार्थिनीवर बळजबरीने अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, दिनेशने तिला शिर्डीतील हॉटेलमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केला आणि अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सप्टेंबर २०२३ पासून जुलै २०२४ पर्यंत घडला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने राहाता तालुक्यातील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर दिनेश बाळासाहेब जाधव याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...