पोलीस निरीक्षक आरोपीच्या पिंजऱ्यात | शिक्षिकेला मानसोपचाराच्या नावाखाली जिवंत मारण्याचाही प्रयत्न
पारनेर | नगर सह्याद्री
जालना पोलिस दलात पोलिस निरीक्षक असणारे परंतू मुळचे वाळवणे येथील रहिवाशी असणाऱ्या सतीश मारुती पवार यांच्यासह त्यांच्या पत्नीने याच गावातील एका महिला शिक्षिकेला मानसोपराचे उपचार देण्याच्या नावाखाली भलत्याच गोळ्या देऊन जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदर महिला शिक्षीकेने केला आहे. स्वत: विवाहीत असतानाही पवार याने सदर महिलेला लग्नाचे अमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सातारा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पाचगणी (सातारा) येथून पवार यांची जालना येथे बदली करण्यात आली. दरम्यान, पवार आणि त्याची पत्नी तसेच त्याचे साथीदार या सर्वांकडून जिवीताला धोका असल्याने पवार याचा जामिन रद्द करण्यात यावा आणि या दोघांनाही तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी पिडीतेने निवेदनाद्वारे केली आहे.
आरोपीच्या पिंजऱ्यातील सतीष पवार हा आणि पिडीता हे दोघेही वाळवणे येथील रहिवाशी आहेत. हे दोघेही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. पवार हा सातारा पोलिस दलात सहायक निरीक्षक म्हणून काम करत असताना पिडीता हे पुणे शहरातील एका खासगी शाळेत शिक्षीका म्हणून काम करत आहे. दोघांचेही लग्न झालेले असताना त्यांच्यात संबंध जुळून आले आणि या दोघांनी देशभरात फिरुन दुनियादारी केली. याच दरम्यान पिडीता गर्भवती राहिल्याने पवार याने तिचा गर्भपात केला. पुढे दोघांच्यात बिनसले आणि पवार याने पत्नीच्या मदतीने आणि त्याच्या काही गुंड मित्रांच्या मदतीने पिडीतेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पवार याला निलंबीत करण्यात आले आणि त्याची बदली जालना येथे करण्यात आली. जामिनावर सुटलेल्या पवार व त्याच्या पत्नी आणि गुंड मित्रांकडून जिवीताला धोका असल्याचा अर्ज पिडीतेने नुकताच न्यायालयात आणि पोलिस अधीक्षकांना सादर केला आहे. पवार याची पत्नी फार्मासीस्ट असून तिने मला मानसोपचाराच्या नावाखाली विषप्रयोग होणाऱ्या गोळ्या दिल्याने तिला देखील आरोपी करावे अशी मागणी पिडीतेने केली आहे.
दादा जगताप, राजेंद्र पारठे, प्रणव पारठे
व वसुधा पवार यांना सहआरोपी करा!
आरोपी सतीश पवार याच्या वाढदिवसानिमित 11 जुलै 2024 रोजी रेन फॉरेस्ट हॉटेल येथे बोलावून घेतले होते व माझी ओळख राजेंद्र पारठे, प्रणव पारठे व त्यांचे मॅनेजर विशाल कांबळे यांच्याशी करुन दिली होती. राजेंद्र पारठे यांनीच सतीश पवार याच्या सांगण्यावरून मला रूम दिली होती. त्यावेळी त्यांनी कोणतीही माझी माहिती घेतली नव्हती त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी मला सतीश पवार यांनी घेऊन गेलेल्या डॉक्टरनी दिलेल्या गोळ्यांनी त्रास होऊ लागल्याने मी त्यांना हे बोलण्यासाठी विचारत असताना त्यांनी मला वाई येथील मॅप्रो येथे बोलावले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची पत्नी वसुधा आली होती. आमचं बोलणं चालू असतानाच मला चक्कर आल्याने ते मला त्यांचे राहते घर दंडेघर येथे घेऊन गेले. त्या दिवशी मी, आरोपी सतीश पवार यांची पत्नी वसुधा यांनी बरोबरच जेवण केले त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली, नंतर त्यांनी मला तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे असे म्हणून जबरदस्तीने गोळ्या घेण्यास मी नको म्हणत असताना भाग पाडले त्या दरम्यान त्यांनी माझे नकळत फोटो काढले, त्या दिवशी मी तेथेच दांडेघर येथे मुक्कामी राहिले, दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी सतीश पवार त्याची बायको वसुधा आरोपीचा मित्र प्रकाश उर्फ दादा जगताप हे मला सोडण्यासाठी वाई बस स्टॉप येथे आले तेथे आल्यानंतर मी पुन्हा चक्कर येऊन पडल्याने त्यांनी मला कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले व संध्याकाळी स्वारगेट येथे सोडले. त्यावेळी वाई वरून निघताना दादा जगताप हा गाडी चालवत होता वरील सर्वानी मिळून मला जिवे मारण्याचा कट केला होता आणि या सर्वानी सतीश पवार याला हा गुन्हा करण्यासाठी एक प्रकारे मदतच केली असल्यामुळे वरील सर्वांना सदर गुन्हयात सह आरोपी करण्याची मागणी पिडीतेने दि. 21 मार्च 2025 रोजी पाचगणी पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे.
सतीश पवार याला पुन्हा सेवेत घेण्यास पीडितेचा विरोध
पिडीतीन दिलेल्या अर्जात म्हटले आही की, पवार याने माझ्यावर आत्याच्यार केलेला असुन त्यासंदर्भात सदर आरोपीविरुद्ध पाचगणी पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. 294/2024 प्रमाणे भा. द. वि. थे. कमल 376 (2), 392, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीला निलंबन केलेले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर देखील आरोपी यांनी मला वेगवेगळ्या प्रकारे नातेवाईकांकडून मित्र मैत्रिणीमधून व प्रत्यक्ष भेटुन धमक्या देऊन सदरची केस मागे घेण्यासंदर्भात दबाव टाकत आहे. सदरच्या दबावातुन मी एक वेळी दबावाखाली व भीतीपोटी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेले होते. परंतु त्याच्या दबावाला बळी न पडता त्यासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देउन मी सदरची प्रकरणे पुढे चालवत आहे. परंतु आजही सदरचा आरोपी मला वेगवेगळ्या प्रकारे धमकावत आहे. त्यामुळे सदरचा आरोपी जर पुन्हा नोकरीला गेला तर पोलीस विभागतील ओळखीचा व पदावर असल्याचा गैरफायदा घेउन मझ्यावर दबाव टाकुन सदरच्या केसवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीस नोकरीवर घेऊ नये व त्याचे निलंबन कायम करण्याची मागणी पिडीतेने केली आहे.
जीवितास धोका असल्याने जामीन रद्द करण्याची मागणी
पिडीतीने न्यायालयाकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे की, माझ्या व माझ्या मुलाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून त्वरित सदर गुन्हयातील आरोपी याचा न्यायालयाकडून मंजूर केलेला जामीन त्वरित रद्द करून पुढील या केस संदर्भात न्यायालयाचा अंतिम निकाल आदेश होईपर्यंत मला व माझ्या मुलाला तसेच या गुन्हयातील मुख्य साक्षीदारांना सुरक्षित वाटेपर्यंत संबंधित आरोपीला कृपया जामीन देण्यात येऊ नये आणि आरोपीपासून संरक्षण मिळावे अशी मागणी पिडीतेने केली आहे.
तिच्याकडून माझी बदनामी, दावा ठोकणार; सतिष पवार
माझ्या विरोधात तक्रार करणाऱ्या संबंधित महिलेशी माझा कोणताही संबंध नाही. तिच्याकडून माझी बदनामी करण्याचा सपाटाच चालू आहे. याबाबत मी आता कायदेशिर सल्ला घेतला असून तिच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करत आहे. महिला म्हणून तिला कायद्याचे संरक्षण असले तरी ती वाट्टेल ते आरोप करणार असेल तर ते मी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली.