अहमदनगर। नगर सह्याद्री-
पाथर्डी तालुयातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीवर (वय १५) मानखटाव (जि. सातारा) तालुयातील एका गावामधील पालात तरूणाने अत्याचार केला. तिच्यासह आईला व अन्य एक व्यक्तीला मारहाण केली. दरम्यान पीडित मुलगी मंगळवारी (दि. २७) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानंतर तिच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करून तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तीन ते चार जणांविरोधात अत्याचार, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सदरची घटना औंध (जि. सातारा) पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे सदरचा गुन्हा तपासकामी औंध पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सुशील रामकिसन बनसोडे (रा. भालगाव ता. पाथर्डी) व त्याचे इतर दोन ते तीन अनोळखी साथीदारांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची घटना २ डिसेंबर २०२३ रोजी रात्री एक ते २४ फेब्रुवारी २०२४ रात्री अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे. सुशील बनसोडे याने पीडित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर पालात बळजबरीने अत्याचार केला. तिने विरोध केला असता कमरेच्या पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सुशील बनसोडे व इतर दोन ते तीन जणांनी पीडित मुलीची आई व एका व्यक्तीला शिवीगाळ करून लाकडी दांडयाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. सुशील बनसोडे याने पीडितेसह इतरांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास औंध पोलीस करीत आहेत.