spot_img
अहमदनगरतुफान पाऊसाच्या सरी!, "नदीकाठच्या 'या' गावांना सतर्कतेचा इशारा"

तुफान पाऊसाच्या सरी!, “नदीकाठच्या ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा”

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसर जलमय झाला असून कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून साडेसात हजार युसेस्कने पाण्याचा विसर्ग झाल्याने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कुकडी प्रकल्पातील धरणांवर आता जोरदार पाऊस सुरू असल्याने कुकडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत कुकडीच्या प्रकल्पात सरासरी पासष्ट टक्के पाणीसाठा झाला आहे. तर कुकडी मधील वडज, डिंबे आणि येडगाव धरणाच्या सांडव्यातुन शनिवार पासून निसर्ग सोडण्यात आला आहे. तिन्ही धरणातुन कुकडी नदीपात्रात २८ हजार युसेस्कने विसर्ग सुरू असल्याने कुकडी अंतर्गत येणार्‍या जुन्नर, पारनेर व शिरुर तालुयातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील आठवड्यात पाऊस कमी असल्याने कुकडी प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प होता. मात्र तीन चार दिवसांपासून कुकडी प्रकल्पात येणार्‍या धरणांवर पाऊसाचा जोर वाढला आहे. कुकडीच्या डिंबा, येडगाव वडज, पिंपळगाव जोगा व माणिकडोह धरणात पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. येडगाव धरणातुन साडेसात हजार युसेस असा अठ्ठावीस हजार युसेसने कुकडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कुकडीच्या धरणांमध्ये सरासरी ६५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी पाऊसाचे प्रमाण जास्त असल्याने गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी धरणातील पाणीसाठा समाधान कारक होईल. यामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुयातील शेतकर्‍यांना समाधानाचे वातावरण आहे. येडगाव ८२.२४, माणिकडोह ४४.८६, वडज ५६. ३७, पिंपळगाव जोगे १५.२४, डिंभे ९४. ५९, विसापूर ५३.७१, चिल्हेवाडी ७९.०७ , घोड ७४. ३७ कुकडी प्रकल्प-६४.८२ टक्के अशाप्रकारे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांचा साठा गेली चार दिवसात बर्‍यापैकी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.

नागरिेकांनी खबरदारी घ्यावी
कुकडी नदीपात्रात (जुन्नर, पारनेर व शिरूर तालुका) पाणी प्रवाह सुरू होणार आहे. तो कोणत्याही क्षणी वाढण्याची शयता आहे. गावातील तमाम नागरिकांना दवंडीद्वारे किंवा ध्वनि प्रक्षेपकाद्वारे सावधनतेचा इशारा देण्यात यावा. तसेच आपली जनावरे व इतर उपयोगी वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी, वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता
कुकडी पाटबंधारे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...