spot_img
ब्रेकिंगसाहेबांचे खासदार-आमदार दादांसोबत एकत्र; चर्चाना उधाण

साहेबांचे खासदार-आमदार दादांसोबत एकत्र; चर्चाना उधाण

spot_img

कऱ्हाड / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी पुण्यतिथीदिनी अभिवादनास आले होते. त्याचदिवशी खासदार शरद पवारही तेथे येणार होते. त्यांच्या अगोदरचं अजित पवारांनी सकाळ-सकाळीच समाधिस्थळी अभिवादन करुन लगेचच मुंबई गाठली होती.

त्यावेळी मात्र शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील हे उपस्थित नव्हते. आज १२ मार्चला यशवंतरावांच्या १११ व्या जयंतीदिनी खासदार पाटील आणि आमदार पाटील यांनी अजित पवारांसमवेत समाधीचे दर्शन घेत कार्यक्रमासही उपस्थिती लावली. त्याचीच चर्चा सध्या सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती होती. त्यानिमित्त त्यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार आनंदराव पाटील, अॅड. आनंदराव पाटील -उंडाळकर, राजेश पाटील-वाठारकर, सादिक इनामदार, जितेंद्र डुबल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमावेत अभिवादनासाठी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील व त्यांचे पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते. त्याचबरोबर दरवर्षी प्रीतिसंगमावरील समाधी परिसरात कऱ्हाडच्या आदरणीय पी. डी. पाटील प्रतिष्ठानमार्फत १२ मार्चला यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी समूह गीत गायन स्पर्धा घेण्यात येते.

यंदाही ती घेण्यात आले. त्या गीत गायन कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विनंतीनुसार उपमुख्यमंत्री पवार उपस्थित राहिले. सध्या दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रसमधील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच कऱ्हाडला खासदार शरद पवार गटाचे खासदार, आमदार उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याने सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, तो सांभाळून कामकाज कसे करायचे हे दाखवले. त्यांनी केंद्रात उपपंतप्रधान, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आदर्शवत आहे. राजकारणात अलिकडे वाचाळविरांची संख्या वाढली आहे. कोण खेकडा म्हणते, कोण वाघ म्हणतो. कोणीही काहीही बोलत असतात.

ज्यावेळी आपण यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतो, त्यावेळी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. राजकारणात सुस्कृतपणा आला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्याचाच प्रत्यंतर आज कऱ्हाडला आला. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत खासदार शदर पवार गटाचे खासदार, आमदार यांनी अभिवादनासह कार्यक्रमासाठी थांबून सुसंस्कृतपणाच दाखवला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...