spot_img
अहमदनगरआजच्या खासदाराचे दोन टक्के काम....; जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही;...

आजच्या खासदाराचे दोन टक्के काम….; जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही; माजी खासदार विखे यांनी साधला खासदार लंके यांच्यावर निशाणा

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्के सुद्धा काम आजच्या खासदाराने केलं नाही. माझा पराभव झाला, पण मी जनतेसाठी थांबलो नाही. जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणं योग्य नाही. आम्ही थांबलो असतो तर जिल्ह्याचा विकासच थांबला असता. असा शब्दात माजी खासदार डॉ. विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला तसेच अहिल्यानगर शहरात ५११ एकर मधे एमआयडीसी उभारण्याचा आमचा निर्धार आहे. जमीन दिली आहे, सातबाऱ्यावर बोजा चढवला आहे. न्यायालयीन अडथळे असूनही पुढील सहा महिन्यांत एमआयडीसी सुरू होईल. अशा विश्वास व्यक्त केला.

जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या युनिटचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक संजय गोगरे डॉ नागरगोजे . डॉ. मुंडे, डॉ. गाडे, जिल्हा शहराध्यक्ष अनिलराव मोहिते, अशोक गायकवाड, अतुल चिटणीस, गाडगे महाराज बाबू शेठ टायरवाले सानप, शेळके साहेब, बाबुराव विविध विभागांतील अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधीतून सिव्हिल हॉस्पिटल साठी वेगवेगळ्या कारणाने ७५ कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगरसाठी मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याच्या जनतेसाठी ही आरोग्यसेवेची मोठी भेट मिळाली आहे. महायुती सरकारने आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात जेवढं काम केलं ते मागील काही वर्षांत कधीच झालं नव्हतं. जिल्हा रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्यसेवेत कार्यरत असून कोविड काळात या रुग्णालयाने उल्लेखनीय सेवा बजावली. त्या काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात सिव्हिल हॉस्पिटलने मोलाची भूमिका बजावली. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन, आज अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट सुरू करण्यात आले आहे.

सरकारतर्फे उपलब्ध होत असलेल्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांनाही हृदयरोगावरील उच्च दर्जाच्या उपचारांची सुविधा मोफत मिळावी हा हेतू या युनिटमागे आहे. पूर्वी खाजगी रुग्णालयांमध्ये कराव्या लागणाऱ्या महागड्या तपासण्या आणि उपचार आता जिल्हा रुग्णालयात सुलभ आणि मोफत मिळणार आहेत. ही सेवा जनतेसाठी एक मोठी दिलासा ठरणार आहे. ते पुढे म्हणाले, आज महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला १८ कोटी रुपयांची आरोग्य सुविधा अर्पण केली आहे. पुढील काळातही आम्ही एकजुटीने राहून अहिल्यानगरच्या विकासासाठी प्रत्येक योजना पूर्ण करू.

पुढे बोलतांना डॉ. विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल. दुसरीकडे नेण्याचा प्रश्नच नाही. हा शब्द मी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने देतो. आगामी काही दिवसांत आम्ही दहा कोटी रुपयांच्या खर्चाने महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत. या केंद्रात शहरी आणि ग्रामीण महिलांना बचत गटांमार्फत रोजगार प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील. मतदान ही लोकशाहीची ताकद आहे. चुकीचा माणूस निवडला तर आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात येईल. विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा. हा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर तुमच्या भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना मिळणार सुविधांचा लाभ
जिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या या अत्याधुनिक युनिटमुळे जिल्ह्यातील हजारो हृदयरुग्णांना नवीन जीवनदान मिळेल. शासनाच्या मदतीने आणि जनतेच्या पाठबळावर आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. या कॅथलॅब युनिटमुळे हृदयरोग निदान व उपचार यासाठी लागणारी सर्व आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजनांमधूनही नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
– आमदार संग्राम जगताप

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...