spot_img
ब्रेकिंगआजचे राशी भविष्य! आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा सविस्तर

आजचे राशी भविष्य! आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री

मेष राशी भविष्य
अत्यंत व्यस्त वेळापत्रक असूनही आपले आरोग्य चांगले राहील. धनाची काळजी महत्त्वाची असली तरी त्याच्या तणावामुळे नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका. धाकट्या भावंडांकडून सल्ला मिळेल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही रमाल. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. घरातील लहान सदस्यांसोबत पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारावर आज तुम्ही भरपूर खर्च कराल, पण दिवस सुखद असेल.

मिथुन राशी भविष्य
आज तुमच्या निर्णयक्षमतेची कसोटी लागेल. सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. आजचा दिवस इतरांसाठी काहीतरी करण्याचा आहे. प्रेमप्रकरणात आजचा दिवस विशेष असेल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमी आहे. घनिष्ट मित्रांसोबत आनंदी वेळ घालवण्याची शक्यता आहे. गेले बरेच दिवस तुमच्यावर आलेले ताण आज कमी होईल.

सिंह राशी भविष्य
आरोग्याची काळजी घ्या. संचित केलेला पैसा येणाऱ्या काळात उपयोगी पडेल. कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनामुळे आनंदी वातावरण राहील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला थोडा ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव मिळतील. आजचा दिवस अनपेक्षित पाहुण्यांसाठी खास असेल.

तुळ राशी भविष्य
आज तुमच्या देण्याच्या वृत्तीमुळे शंका आणि निरुत्साह दूर होतील. भाऊ-बहिणीकडून आर्थिक मदत मागितली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडेसे आर्थिक दबावात याल. घरातील काही सदस्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला चिंत येऊ शकते. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकर्मी आणि बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील. मित्रांसोबत वेळ घालवू शकता, पण वाईट सवयींपासून दूर राहा. तुमचा जोडीदार आज काहीतरी विशेष करेल.

धनु राशी भविष्य
आज तुम्ही करमणुकीत रमाल. आर्थिक समस्यांमुळे आज काही ताण येऊ शकतो. जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. आश्चर्यकारक संदेशामुळे तुम्हाला गोड स्वप्नं पडतील. व्यवसायात चांगले लाभ मिळतील. स्वतःसाठी वेळ मिळेल. आज तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा दिवस खास असेल.

कुंभ राशी भविष्य
इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे प्रकृती ताजीतवानी होईल. परदेशात व्यापार करणाऱ्यांना धन लाभ होईल. नातेवाईक आणि मित्रांकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रेमसंबंध प्रस्थापित होतील. कामात यश मिळेल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

वृषभ राशी भविष्य
बाहेरील खेळ आणि योगाचा फायदा होईल. आर्थिक लाभ होईल. भाऊ पाठिंबा देईल. प्रेमसंबंध कठीण असतील. मनोरंजनासाठी चांगला दिवस. कामात काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल.

कर्क राशी भविष्य
मुलं वागणार नाहीत, रागावर नियंत्रण मिळवा. धनाची देवाण-घेवाण यशस्वी होईल. प्रिय व्यक्तीला गोड स्वप्न दाखवाल. कामात फायद्यात राहाल. आजचा दिवस चांगला जाईल.

कन्या राशी भविष्य
अवघडेलपण, मित्रांच्या मदतीमुळे अडचणी दूर होतील. संतानामुळे आर्थिक लाभ होईल. प्रेमसागरात डुबकी माराल. कामात स्तुती मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

वृश्चिक राशी भविष्य
आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमुळे उत्साह मिळेल. घरातील सदस्यांकडून आर्थिक मदत टाळा. कुटुंबात आनंद राहील. प्रियजनांना हसवणे तुमचे औषध ठरेल. कामात वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. जोडीदारासोबत छान वेळ जाईल.

मकर राशी भविष्य
कोलेस्टेरॉलयुक्त आहार टाळा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबाच्या गरजांना प्राथमिकता द्या. प्रेमाच्या रंगात बुडालेला दिवस. स्त्री सहकाऱ्यांचे पाठबळ मिळेल. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवाल. रोमँटिक वेळ जाईल.

मीन राशी भविष्य
आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष नका. अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. मुलांशी कडक वागू नका. प्रेमाचा अनुभव मिळेल. क्रिएटिव्ह कामात गुंतवा. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तणाव वाढून जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...