spot_img
अहमदनगरसावकाराच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा!

सावकाराच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा!

spot_img

पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डीतालुक्यातील धायतडकवाडी येथील गरडवस्तीवरील रहिवाशी बाबासाहेब नामदेव धायतडक (वय 46) यांनी सावकाराच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी (दि.12) आत्महत्या केली. आत्महत्येपूव मयत बाबासाहेब धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गर्जे (रा. अकोला, ता. पाथड) याने वेळोवेळी दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे.

मयत बाबासाहेब धायतडक यांचा मुलगा सचिन बाबासाहेब घायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, त्यांच्या वडिलांनी एक वर्षांपूव म्हशी घेण्यासाठी बाळासाहेब बबन गर्जे याच्याकडून 10 टक्के व्याज दराने 6 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी 5 लाख रुपये त्यांनी व्याजासह परत केले होते. मात्र तरीही बाळासाहेब बबन गर्जे यांनी आणखी 5 लाख रुपयांची अवास्तव मागणी करत सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली. 11 जून रोजी गर्जे यांनी सार्वजनिकरित्या वडिलांना अपमानित करत शिवीगाळ केली व पैसे दे नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर कर अशी धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, 12 जून 2025 रोजी सकाळी बाळासाहेब बबन गर्जे याचा पुन्हा फोन आला आणि पाथड येथील कोरडगाव चौकात येण्यास सांगितले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या बाबासाहेब धायतडक यांनी सकाळी 9.30 वाजता घरातून निघून आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूव त्यांनी गावातील व्यक्तींना व्हॉट्सपवर एक चिठ्ठी पाठवली होती, ज्यात बाळासाहेब बबन गर्जे यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत आहे असे लिहिले होते. ‌‘बाळासाहेब आज दहा वाजता पाथड कोरडगाव चौकात हाणार होता (मारहाण करणार होता), म्हणून आत्महत्या करीत आहे असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे

गुरुवारी सायंकाळी पाथर्डीयेथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर बाळासाहेब बबन गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात बाबासाहेब धायतडक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक विवाहीत आणि अविवाहित मुलगी तसेच दोन अविवाहीत मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...