spot_img
महाराष्ट्रवारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील वारकरी मल्हारी बाजीराव पवार यांच्या मोटारसायकलला एका अनोळखी ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात मल्हारी पवार (वय 57) व पंखाबाई मल्हारी पवार (54) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेने येळपणे गावावर शोककळा पसरली आहे.

पंखाबाई पवार या येळपणे येथील खंडेश्वर महाराज दिंडीत पायी गेल्या होत्या. आपल्या पत्नीला आणण्यासाठी मल्हारी पवार हे मोटारसायकलवरून शनिवारी पंढरपूरला गेले होते. शनिवारी संध्याकाळी पंढरपूर येथील पांडुरंग मंदिराच्या कळसाचे दोघांनी दर्शन घेतले. घराकडे परतण्यासाठी दोघे मोटारसायकलवरून रविवारी सकाळी निघाले. सोलापूर-पुणे रोडने येत असताना भिगवणजवळ एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली.

मल्हारी पवार जागीच ठार झाले, तर पंखाबाई पवार यांना भिगवण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यापूवच त्यांचे निधन झाले. या घटनेचे वृत्त समजताच सैनिक संघटनेचे नवनाथ खामकर व त्यांचे सहकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मदतकार्य केले. रविवारी संध्याकाळी दोघांवर शोकाकुल वातावरणात येळपणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मयत दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...