spot_img
ब्रेकिंग"पारनेरच्या वाघिणीने वायनाडमध्ये उभारला पूल" कोण आहेत मेजर सीता शेळके?, जाणून घ्या...

“पारनेरच्या वाघिणीने वायनाडमध्ये उभारला पूल” कोण आहेत मेजर सीता शेळके?, जाणून घ्या सविस्तर..

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री:-
वायनाडमध्ये अक्राळविक्राळ भूस्खलनानंतर चूरामला येथे संपर्क तुटलेल्या मुंदकाईपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी तातडीने पूल उभारणे गरजेचे होते. लष्कराच्या मद्रास सॅपर्सची ७० जणांची टीम या कामाला लागली. ३१ तासांच्या अविश्रांत श्रमानंतर हा बेली पूल उभारण्यात आला आणि मुंदकाईपर्यंत बचाव व मदत करणाऱ्यांना धाव घेता आली. मद्रास सॅपर्सच्या या टीमचे नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या मेजर सीता अशोक शेळके यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या मेजर सीता शेळके या २०१२ मध्ये लष्करात दाखल झाल्या. त्यांनी चेन्नईच्या लष्कराच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेतले. त्यांची नियुक्ती लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप अर्थात मद्रास सॅपर्समध्ये झाली. अवघड व दुर्गम भागात लष्कराला पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या सॅपर्सकडे असते. याच तुकडीला वायनाडला बोलावण्यात आले होते. कारण होते मुंदकाईला पोहोचण्याचे. मुंदकाईवर शब्दशः आभाळ कोसळले होते. डोंगराचा मोठा भाग या गावावर पडला.

गावात जाण्यासाठीचा पूलही या प्रलयात वाहून गेला. त्यामुळे जगाशी संपर्क तुटला. मदत व बचावकामासाठी तेथे जाण्याची कोणतीच सुविधा नसताना मद्रास सॅपर्सने हे काम हाती घेतले. मेजर सीता शेळके यांनी आपल्या टीमसोबत ३१ तास क्षणभराचीही विश्रांती न घेता १९ पोलादी पॅनल्सच्या मदतीने हा पूल उभारला. पूल तयार झाला आणि त्यावरून बुलडोझर, जेसीबीसारखी अवजड यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना झाला.

मेजर सीता शेळके यांची पुलाची उभारणी करतानाची छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रकाशित झाली आणि त्या केवळ केरळातच नव्हे तर संपूर्ण देशात हिरो ठरल्या. नेटकऱ्यांनी मेजर सीता यांना वाघीण अशी उपमा देत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले.

लवकरात लवकर आपत्ती ग्रस्तांची सुटका व्हावी. भारतीय लष्कराचा अभिमान आहे.सीताच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा देशाला फायदा झाला याचा मनस्वी आनंद झाला.
-नंदा अशोक शेळके,( मेजर सीता शेळके यांच्या मातोश्री)

कोण आहेत मेजर सीता शेळके?
सीता शेळके यांचं मूळगाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाळीलगाव आहे, सध्या त्यांचे आईवडील टाकळी ढोकेश्वर या गावात राहतात, सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील आहेत.चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA) मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करत सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या. मेजर सीता शेळके या बेंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील (MEG) 70 सदस्यीय संघातील एकमेव महिला अधिकारी आहेत. त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेली ब्रिजचे बांधकाम 31 तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं.
मेजर शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...