spot_img
अहमदनगरटायगर अभी जिंदा है! पराभवामुळे पुढच्या पिढीचं नुकसान; माजी खासदार विखे यांचा...

टायगर अभी जिंदा है! पराभवामुळे पुढच्या पिढीचं नुकसान; माजी खासदार विखे यांचा खासदार लंके यांच्यावर हल्लाबोल

spot_img

Ahmednagar Politics News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच नगरचे राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. पराभवामुळे माझं नाही तर मतदारसंघाचं आणि पुढच्या पिढीचं नुकसान झाल्याचं म्हणत मी कुठे गेलेलो नाही, टायगर अभी जिंदा है..” वादळ येत असतात. अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैन येथील कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांनसोबत संवाद साधला. पुढे बोलतांना खा. विखे पाटील म्हणाले, मी कुठे गेलेलो नाही संपलेलो नाही टायगर अभि जिंदा है. अशे अनेक वादळ येत असतात मात्र निवडून आलेल्या माणसाच्या भाषणा मध्ये कधीच समाज हिताचं काम नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं काम नाही, परिवर्तन व्हावं असं कधीच ऐकायला मिळत नाही. फक्त हा बोगस, याला गाडू, तो हरामखोर फक्त एवढंच बोलतात, असा टोला सुजय विखे यांनी लकेंना लगावला.

तुम्ही कसं मतदान टाकता, आज जी गर्दी आहे त्यातल्या निम्म्या लोकांनी माझा कार्यक्रम लावला. तरी देखील मी तुमच्यामध्ये आलोय. पण कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पिढीचा कार्यक्रम तुम्ही लावला. मा‍झ्या पडण्याने नुकसान तुमच्या लोकांचं झालं आहे, अशी खंत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...