spot_img
अहमदनगरमहापालिकेची 'ती' योजना नगरकरांना लूटण्याचा डाव! बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त...

महापालिकेची ‘ती’ योजना नगरकरांना लूटण्याचा डाव! बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त…

spot_img

किरण काळे | बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील, योजना मागे घेण्याची काँग्रेसची आयुक्त, आमदारांकडे मागणी
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मनपाने शहरातील मोक्याच्या 35 रस्ते, जागांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे. यामध्ये शहराच्या मध्यवत बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहरातील मालमत्तां धारकांकडून सुधारित कर आकारणीचा देखील घाट घातला गेला आहे. प्रत्यक्षात नळाला दररोज स्वच्छ मुबलक पाणी येत नाही, रस्त्यांची दैनावस्था अजून संपलेली नाही, 778 रस्त्यांच्या कामांमध्ये बनावट टेस्ट रिपोर्टच्या आधारे सुमारे 150 कोटींहून अधिक रकमेचा स्कॅम झाला आहे, कचरा संकलनाचा बोजवारा उडालेला असून शहरात ठिकठिकाणी कचरा आहे, पथदिवे बंद आहेत. कोट्यावधींचा कर भरूनही मूलभूत सुविधा मनपा देत नाही.

असे असताना देखील पे अँड पार्किंग योजनेची घोषणा आणि प्रस्तावित अंमलबजावणी म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लूटण्याचा डाव आहे. या निर्णयामुळे बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील. मनपाने तात्काळ ही योजना मागे घेण्याची मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे, आ. संग्राम जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून रस्त्यांलगत, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्कच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्याआधारे वसुली नियोजित केली जाणार आहे. याला काँग्रेसचे किरण काळे यांनी विरोध केला आहे. मनपाने प्रस्तावित वसुली अत्यल्प रकमेची दाखवली असून धूळफेक करत नागरिकांकडून मात्र प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांची वसुली यातून केली जाणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

त्या घटकांना रस्त्यावर आणू नका 
गाडगीळ पटांगणामध्ये पार्किंग प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हातावर पोट भरणारे भाजी विक्रेते आपला प्रामाणिकपणे व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. प्रत्यक्षात या ठिकाणी अद्यावत असे भाजी मार्केट विकसित करायचे सोडून स्वयंरोजगार करणाऱ्यांना बेरोजगार करून देशोधडीला लावले जात आहे. ऐतिहासिक नेहरू मार्केट बुलडोझर लावून अनेक वर्षांपूव जमिनदोस्त करण्यात आले. त्या जागी नवीन संकुल उभारणीचे आश्वासन देऊन धुळफेक केली गेली. प्रत्यक्षात आता त्या जागेवरील संकुलाचा प्रकल्प बासनात गुंडाळून पार्किंग साठी जागा लाटली जात आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात चौपाटी विकसित झाली आहे. या माध्यमातून अनेकांनी स्वयंरोजगार मिळविला आहे. मात्र हा परिसर देखील मनपाने नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. मध्यवत बाजारपेठेत पूवसारखा व्यापार राहिलेला नाही. त्यातही आता बाजारपेठेतील अनेक ठिकाणी सशुल्क पार्किंगमुळे ग्राहक पाठ फिरवतील. यामुळे बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील. हा तुघलकी कारभार मनपा व सत्ताधाऱ्यांनी तात्काळ बंद करावा, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

नगरकरांची लूट
खासगी संस्थेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून नाशिक येथील खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला पे अँड पार्क वसुलीसाठी पाच वर्षांकरिता रु. 21.75 लाखांना टेंडर देण्यात आले आहे. म्हणजे वर्षाला रु. 4.35 लाख, प्रत्येक महिन्याला रु. 36 हजार 250 तर प्रत्येक दिवसाकाठी रु. 1 हजार 209 एवढी अल्प रक्कम सदर संस्था मनपाला देणार आहे. दुचाकीसाठी एक तासा करिता मनपा या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून 5 रुपये आकारणार आहे. म्हणजे संपूर्ण शहरात 36 ठिकाणच्या पार्किंग मधून प्रत्येक दिवशी केवळ 242 दुचाकींचीच वसुली यामध्ये गृहीत धरली आहे. म्हणजे दर दिवशी सरासरी प्रत्येक ठिकाणी सहा ते सातच वाहनांच्या वसुलीतून एका दिवसाचे रु. 1,209 संस्था वसूल करणार आहे. हा तर मनपाचा नगरकरांना खाजगी संस्थेच्या आडून लुटण्याचा डाव असल्याचा घाणाघाती आरोप किरण काळे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...