spot_img
अहमदनगरश्रीरामपूरच्या रस्त्यावर थरार; भरदुपारी गोळीबार; आमदार ओगले म्हणाले, पोलीस सामील..

श्रीरामपूरच्या रस्त्यावर थरार; भरदुपारी गोळीबार; आमदार ओगले म्हणाले, पोलीस सामील..

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गिरमे चौकात भरदुपारी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली. ग्रॅज्युएट चहा दुकानासमोर झालेल्या वादात गावठी कट्ट्याद्वारे दोन गोळ्या झाडल्या प्रकार शुक्रवारी घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार करणारा हुजेफा अनीस शेख (रा. वॉर्ड नं. २) हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संघर्ष दिघे, सागर बेग, आकाश बेग, रोहीत दिनकर यादव व राष्ट्रीय श्रीराम संघाचे इतर कार्यकर्ते मशीदीवरील भोम्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय श्रीरामपुर येथे निवेदन देवून परत शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील ग्रज्युएट चहाच्या समोरील चायवाला यांच्या दुकानावर चहा घेण्यासाठी थांबले होते.

संघर्ष दिघे हा सर्वांसोबत चहा घेत असतांना त्याच्या ओळखीचा मित्र सोनू राठोड हा ग्रॅज्युयट चहा दुकानासमोर आला व त्याने संघर्षला इशारा करुन जवळ बोलविले तेव्हा तो सोनु राठोड याचेजवळ जागुन बोलत असतांना त्यातिकाणी संघर्ष याच्या ओळखीचा हुजेफा अनीस शेख (रा. वार्ड नं. २ श्रीरामपुर ) आला व त्याने संघर्ष याच्याकडे पाहुन विनाकारण त्यांच्या कमरेला खोसलेला पिस्टल काढून लोड करण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा संघर्ष याने त्याला धक्का देवुन खाली पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो खाली न पडता तेथुन बाजुला असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळील बोळीतुन पळाला.

हा सर्व गोंधळ निवेदन देणारे कार्यकर्ते व मित्रांनी पाहील्याने ते देखील संघर्षाच्या मागे पळाले, तेव्हा संघर्ष दिघे, तुषार कुन्हे व इतर काहीमित्र असे हुजेफा शेख याच्या मागे-मागे त्याला पकडण्यासाठी पळाले असता त्याने पुढे पळत असतांना पाठीमागे पाहून संघर्ष याला जीवे ठार मारण्याच्या उद्देश्याने त्याच्या दिशेने त्याचेकडील पिस्तोलमधुन दोन गोळ्या झाडल्या. त्यातून गोळी वाचवत पुन्हा त्याचे मागे पळाले असता तो सैलानी बाबा दर्गाकडून कोठेतरी पसार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश: आ. ओगले
शहरातील गुन्हेगारीवर पोलीस नियंत्रण ठेवण्यात पूर्ण अपयशी ठरत आहेत. तीन वेळा सांगूनही काहीच बदल झालेला नाही, गुन्हेगार खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत आहेत आणि पोलीस हातावर हात धरून बसले आहेत. या गुन्हेगारांबरोबर पोलीसही सामील आहेत, असा गंभीर आरोप आमदार ओगले यांनी केला. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून जे खरे आरोपी आहेत ते मोकाट फिरत आहेत, असेही आमदार ओगले म्हणाले. पुढे असेच चालू राहिल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील, आणि मग प्रशासन थांबवू शकणार नाही, असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...