spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये कुस्त्यांचा थरार; चांदीच्या गदेचे शहरात आगमन..

अहिल्यानगरमध्ये कुस्त्यांचा थरार; चांदीच्या गदेचे शहरात आगमन..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद अहिल्यानगरला मिळाले असून दि.२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत माती व गादी या दोन्ही प्रकारांमध्ये कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या स्व. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत भव्य स्टेज, रेसलिंग प्लॅटफॉर्म, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

कुस्त्यांसाठी गादीचे २ व मातीचे २ असे चार आकडे तयार करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील ४१ जिल्ह्यांमधून सुमारे ८६० मल्लांचे शहरात आजपासूनच होण्यास सुरवात होणार आहे. तब्बल पाच दिवस चालणार्‍या या स्पर्धेसाठी १२५ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंचाची नेमणूक करण्यात आली आहे. मैदानात भोवती सुमारे २५ हजार कुस्ती शौकिनांसाठी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली असून तिची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा.डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी गेल्या पंधरा-वीस दिवसापासून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी व नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. बुधवार २९ जानेवारी रोजी सकाळपासून राज्यातून आलेल्या मल्लाचे गटाप्रमाणे वजन घेण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती कुस्तीगीर संघाचे कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक शिर्के व अर्जुन शेळके यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंयपद कुस्ती स्पर्धांसाठी दोन मातीचे व दोन गादीचे असे चार आकडे तयार करण्यात आले असून एकाच वेळेस चारीही आखड्यांवर कुस्त्या रंगणार आहेत. दिनांक २ फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ व दुपारी ४ ते ९ पर्यंत कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. कुस्त्यांचा हा थरार पाहण्यासाठी शहरातील व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यालयीन सचिव निलेश मदने यांनी केले आहे.

मानाच्या चांदीच्या गदेचे शहरात आगमन
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप हे स्वतः नगरमध्ये आणणार आहेत. आ. संग्राम जगताप हे केंद्रीय राज्य मंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात भेट घेणार असून यांच्या कडून चांदीची गदा स्वीकारणार आहेत. सायंकाळपर्यंत या मानाच्या चांदीच्या गदेचे शहरात आगमन होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...