Maharashtra Crime News: दिवसाढवळ्या पुण्यात हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे. अज्ञात हल्लेखोराने माजी उपसरपंचावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार केले. दत्ता गिलबिले असं हल्ला झालेल्या माजी उपसरपंचाचं नाव आहे.
या हल्ल्यात दत्ता गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूरचे माजी उपसरपंच असलेल्या दत्ता गिलबिले यांच्या हत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. माजी उपसरपंचाच्या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
रविवारी दुपारी दत्ता गिलबिले यांच्यावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार केले, यानंतर जखमी अवस्थेत त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच डॉक्टरांनी दत्ता गिलबिले यांना मृत घोषित केलं. माजी उपसरपंचाची हत्या नेमकी का करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.