spot_img
अहमदनगरशहरात थरार! शेतकऱ्याने आमदाराचं घर जाळण्याचा केला प्रयत्न..

शहरात थरार! शेतकऱ्याने आमदाराचं घर जाळण्याचा केला प्रयत्न..

spot_img

जळगाव-जामोद । नगर सहयाद्री
राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे पडसाद आता थेट लोकप्रतिनिधींवर उमटू लागले आहेत. जळगाव-जामोद येथील भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी एका संतप्त शेतकऱ्याने मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. प्राप्त माहितीनुसार, बावनबीर गावातील शेतकरी विशाल मुरुड (रा. जि. बुलढाणा) याने शेतीच्या नुकसानीसाठी अद्याप मोबदला न मिळाल्याने हा टोकाचा पाऊल उचलले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतरही मदत न मिळाल्याचा आरोप करत, त्याने आमदारांच्या निवासस्थानी पेट्रोल कॅनसह प्रवेश करून “मदत मिळाली नाही, तर घर जाळून टाकतो असा इशारा दिला. घटनेच्या वेळी आमदार डॉ. कुटे स्वतः घरी उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वीय सहाय्यकाने प्रसंगावधान राखत विशाल मुरुड याला रोखले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी जळगाव-जामोद पोलीस ठाण्यात BNS कलम 333 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिके, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागांमध्ये पंचनामे झाले असले तरी मदतीचा निधी अद्याप वितरण झालेला नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.डॉ. संजय कुटे हे २००४ पासून सलग पाच वेळा आमदारपदी निवडून आले असून, विधानसभेत त्यांच्या मुद्देसूद भाषणशैलीसाठी ते ओळखले जातात. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सहकार हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया: आमदार दाते

पारनेर | नगर सह्याद्री सहकार ही सामूहिक प्रयत्नांतून सर्वांगीण प्रगती साधणारी संकल्पना आहे. ग्रामीण भागातील...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!, ‘या’ प्रकरणातील दोन मुख्य आरोपी जेरबंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री तपोवन रोडवरील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे...

70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू!, बंधाऱ्यावर नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने एका 70 वर्षीय वृद्धाचा गाळात अडकल्याने...

खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार180 कोटींचा बोनस

18 जूनपासून खात्यात ‘खटाखट’ पैसे जमा होणार ! मुंबई / नगर सह्याद्री : गोंदियातील धान...