Crime News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून खळबळ उडाली आहे. दिल्लीतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. आई आणि मुलींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तिघांच्या मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी तिघांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे.
दिल्लीतील बदलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची माहिती दिली. त्या घरात तीन जण लोक राहतात. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना सांगितला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजा आणि दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. आई पूजा या मोलरबंद येथील गल्ली क्रमांक १६ येथील ४३ क्रमांकाच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंब राहत होते. दोन्ही मुलीपैकी एक जण १७-१८ वयाची आहे. तर एक जण ८-९ वयाची आहे.
तिघांचे मृतदेह एकाच खोलीत आढळले. तिघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस तपासाच समोर आलं की, ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी आर्थिक विवंचतेून आत्महत्या केल्याचंही बोललं जात आहे. त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून घराचं भाडे दिले नव्हते. तिघांच्या मृत्यूची माहिती मिळताच गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरु केली आहे.