अहिल्यानगर । नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सूत्रे हाती घेताच मोठी कारवाकाका ऊर्फ अब्दुलहक फकीर मोहंमद कुरेशी, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर फैजान इद्रिस कुरेशी, ( रा. झेंडीगेट, जि. ता. अहिल्यानगर), म्हम्या ऊर्फ संदिप शरद शिंदे, ( रा. तय्यब मशीद मागे, जि. ता. अहिल्यानगर ) भगवान चाळ ( रा. भोसले आखाडा, जि. ता. अहिल्यानगर ) यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यामार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन मा. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी वरील तिन्ही व्यक्तींना सहा महिन्यांकरिता जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. सदरच्या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, आणि त्यांच्या पथकातील महिला पोलीस हवालदार शिल्पा कांबळे, पोलीस हवालदार विशाल दळवी, विनोद बोरगे, बाळासाहेव दौंड, वसीम पठाण, साबीर शेख, पोलीस नाईक विजय ठोंबरे, तसेच पोलीस अंमलदार सुरज कदम, सत्यम शिंदे, राम हंडाळ, दिपक रोहकले, सचिन लोळगे, रिंकु काजळे, व महिला पोलीस अंमलदार शिला ढेरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
वृद्ध महिलेचे दागिने लंपास!
अहिल्यानगर
अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानक परिसरातून पाथर्डी येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना मंगळवार, दि. २५ रोजी घडली. श्रीरापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स उघडणी केली.बसमध्ये चढल्यानंतर महिलेने आपली पर्स तपासली असता, पाकीट दिसले नाही आणि पर्सची चेन उघडलेली आढळली. पाकीटात त्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वृद्ध महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
झेंडीगेट परिसरात छापा; ११०० किलो गोमांस जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गोवंशाच्या मांसाची कत्तल आणि विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले. छाप्यात सुमारे ११५० किलो वजनाचे गोमांस जप्त केले. नईम कादिर कुरेशी (वय ३५ वर्ष, रा. बाबा बंगाली, झेंडीगेट, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक झेंडीगेट परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, २२ नंबर मशीद समोरील एका पत्र्याच्या खोलीत बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. घटनास्थळी वरील आरोपी गोमांस विक्री करताना आढळून आला. पथकाने ११०० किलो गोमांस, एक धारदार सत्तूर आणि एक सुरा असा एकूण २ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम २७१, २२३ आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९९५ चे कलम ५(ब), ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
साडेआठ लाखांचा गुटखा जप्त
अहिल्यानगर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत साडेआठ लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी प्रशांत प्रभाकर आव्हाड यास अटक करण्यात आली असून, प्रभाकर गुळवे आणि सलिम सय्यद फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब नागरगोजे यांच्या पथकाने भिंगार नाल्याजवळील रस्त्याच्या कडेला सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किमतींचा गुटखा ५ लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन असा साडेआठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शासकीय आदेशाचे उल्लंघन करून मानवी शरीरास अपायकारक पदार्थांची विक्री करण्याचा उद्देशाने हा साठा बाळगल्याप्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कॅम्प पोलीस स्टेशनचे पोसई राजेंद्र इंगळे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.



