अत्याचार करणाऱ्या नराधमाला एक महिन्यात फाशीची शिक्षा होणे गरजेचे – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला जागेवर फाशीची शिक्षा देण्याची मागणी अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नराधम आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन लहान मुलीच्या हाताने करण्यात आले.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, समाजामध्ये महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर असून महिलांच्या सुरक्षेतेसाठी सरकारने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे मालेगाव येथील चिमुकलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्या नराधमाचा प्रतिकात्मक पुतळा सामाजिक कार्यकर्ता संदीप यादव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाळण्यात आला आहे अशा नरधर्माला एक महिन्याच्या आत शिक्षा होऊन फाशी देण्यात आली पाहिजे यासाठी शासनाने फास्ट कोर्ट न्यायालयात चालवणे गरजेचे आहे यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील पीडित चिमुकली रविवारी सायंकाळच्या सुमारास काही बालकांसमवेत अंगणात खेळत असताना संशयित आरोपी विजय खैरनार याने अन्य बालकांना चॉकलेट देत या चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन घरी नेले. मात्र, घरासमोर खेळत असलेली बालिका दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही. याबाबत इतर बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी चिमुकलीला संशयित विजय खैरनार घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र, शोध घेऊनही विजय व बालिका आढळून आली नाही. त्यानंतर गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चिमुकलीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
यामुळे तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत रात्रीतून फरार आरोपी विजय खैरनार यास अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीत हा सगळा प्रकार समोर आला.
दरम्यान, या प्रकरणी संशयिताला भर चौकात ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लहान मुलीच्या हस्ते निवेदन देऊन केली आहे.
संदीप यादव म्हणाले की मालेगाव येथीलबालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आला आहे त्या नरधामाला तातडीने शिक्षा होणे गरजेचे आहे यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे अशा नरधामाला चौकामध्येच मारून टाकणे गरजेचे आहे त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तातडीने कायद्यात बदल करावे पुन्हा अशा घटना घडणार नाही अशी शिक्षा अशा नरधमाला होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव, माजी नगरसेवक नितीन शेलार, धनंजय जाधव, अंजली आव्हाड, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, विनय वाखुरे, मनेष साठे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते.



