spot_img
अहमदनगरचारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

spot_img

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच पती व सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, मारहाण व हुंड्याची मागणी करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैदूवाडी, सावेडी येथील जयश्री सतीश शिंदे (वय २६) या विवाहितेने तोफखाना पोलिस ठाण्यात पती सतीश अण्णासाहेब शिंदे (वय ३०), सासू अलका अण्णासाहेब शिंदे, सासरा अण्णासाहेब मल्हारी शिंदे व दीर सुरज अण्णासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

जयश्री यांचे लग्न २४ मे २०२३ रोजी वसई पूर्व, पालघर येथील सतीश शिंदे यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार झाले. लग्नात वडील रामा मारुती शिंदे यांनी संसारोपयोगी साहित्य, थाटामाट व सुमारे एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दिले होते. सतीश यांचा पाण्याच्या जारचा प्लँट व गाड्या वॉशिंगचा व्यवसाय आहे. सासरच्या कुटुंबात एकत्र राहतात. लग्नानंतर एक महिना व्यवस्थित गेला, मात्र सतीश यांना दारूचे व्यसन असल्याचे समजताच जयश्री यांनी त्यांना बंद करण्याची विनंती केली. परंतु सतीश यांनी चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण सुरू केली. सासू-सासर्‍यांनीही जयश्री यांना दोष देऊन त्रास दिला.

व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत सतीश व सुरज यांनी मारहाण केली व न आणल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिली. वडिलांनी एक तोळ्याची अंगठी दिली, तरी दबाव कायम राहिला. अखेर २ मे २०२४ रोजी वडील जयश्री यांना माहेरी घेऊन आले.

भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर सतीश यांना बोलावण्यात आले, मात्र ते फक्त एकदाच हजर झाले. अधिकार्‍यांनी समजावले, तरी बदल झाला नाही. तीन वेळा बोलावूनही ते आले नाहीत, म्हणून जयश्री यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहितेचा छळ, पाच लाखांची मागणी
देहरे गावात राहणार्‍या २२ वर्षीय विवाहितेला तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळाला सामोरं जावं लागलं आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा जयराम (रा. देहरे, ता. अ.नगर) हिचा पती जयराम सुरेश आंग्रे याने तिला सतत माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी दबाव टाकला. त्यास नकार दिल्यावर तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याशिवाय सासू बेवी सुरेश आंग्रे, ननंद वर्षा प्रकाश गोडगे (रा. लोणी, ता. राहता), स्वाती पलघडमल (रा. धानोरी, ता. राहुरी) आणि अर्चना अमोल पंडीत (रा. मेहकरी) यांनीही अपमानास्पद शब्दांत हिणवून मानसिक छळ केला. हा छळ दिनांक ५ जानेवारी २०२४ पासून २४ जानेवारी २०२५ पर्यंत सतत सुरू असल्याची फिर्यादीत नोंद आहे. फिर्यादीला उपाशी ठेवून वारंवार मानसिक त्रास देण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.

ऑनलाइन ओळखीने महिलेवर अत्याचार
अहिल्यानगर : जीवनसाथी डॉट कॉमवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका २७ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार करणार्‍या आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीने मारहाण करून मोबाइलचे नुकसान केले व फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शोषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २०२४ च्या मार्च-एप्रिलपासून २०२५ च्या जूनपर्यंत घडली. आरोपीने महिलेला फोनवर बोलण्याचे आमिष दाखवून पहिल्यांदा शहरातील रेडियन्स हॉटेलमध्ये बोलावले. तेथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून मारहाण केली. त्यानंतर पुणे व अहिल्यानगरमधील हॉटेलसह इतर ठिकाणी धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. अजिंय आण्णासाहेब ज-हाड (रा. भायगाव, ता. शेवगाव) असे फरार आरोपीचे नाव आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

बापरे, गुराख्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडले पहा

नागरिकांत घबराट; नागरिकांनी सतर्क रहावे : धाडे पारनेर | नगर सह्याद्री येथील वरखेड मळा परिसरात जनावरे...