spot_img
ब्रेकिंगसाईबाबा मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी; काय म्हटलेय मेलमध्ये...

साईबाबा मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी; काय म्हटलेय मेलमध्ये…

spot_img

सुरक्षा यंत्रणा अलर्ट | संस्थानला आला धमकीचा मेल

शिर्डी | नगर सह्याद्री

जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. साई संस्थानला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला असून मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. भगवंत मान या नावाने हा मेल साई संस्थानला मिळाला आहे. याप्रकरणी साई संस्थानने शिर्डी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

शिर्डीतील साई मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. यात देश, विदेशातील भाविकांचा समावेश असतो. अशातच मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची वारंवार धमकी मिळत आहे. आताही लहरर्सींरपींहारपपूरपवशु.लेा या आयडीवरून साई संस्थानला धमकीचा मेल आला आहे. साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवला असून भाविक, कर्मचार्‍यांना तात्काळ मंदिरातून बाहेर काढण्याचे मेलनमध्ये नमूद करण्यात आले आहे.धमकीच्या मेलनंतर साई संस्थानने शिर्डी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

धमकीच्या मेलने खळबळ
दोन महिन्यांपूर्वीही शिर्डी साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. आता हा खोडसाळपणा की आणखी काही याबाबत शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...