spot_img
अहमदनगर'लाडकी बहीण योजने' पासून हजारो बहिणी राहणार वंचित? नेमकं कारण काय,पहा..

‘लाडकी बहीण योजने’ पासून हजारो बहिणी राहणार वंचित? नेमकं कारण काय,पहा..

spot_img

गणेश जगदाळे। पारनेर
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच त्यांची कुटुंबातील निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने मध्ये अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना या योजनेपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा दिव्यांग आणि केंद्र शासन पुरस्कृत कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन आदेश जारी केला आहे. शासनाने या योजनेसाठी पात्र आणि अपात्र अशा दोन निकषांत अटी मांडल्या आहेत. अन्य योजनांच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपयांचा लाभ घेणार्‍या महिला या योजनेसाठी अपात्र असतील. अर्थसंकल्पातून मुख्यमंत्र्यांच्या या योजनेने महिला भगिनींना सरसकट लाभ दिल्याचा समाज अखेर गैरसमज ठरत आहे. प्रवासासाठी महिलांना सरसकट ५०% टक्के सूट देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे शासनाने पुढे केलेल्या मदतीच्या हातावर मात्र अटींचे काटे ठेवले आहेत.

कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखावर नको ,दरम्यान या योजनेचा लाभ घेताना संबंधित अर्जधारक महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी नको हि अट घालण्यात आली आहे. आणि गरीब कुटुंबातील सदस्य छोट्या मालवाहू व प्रवासी वाहनांच्या माध्यमातून उदारनिर्वाह भागवतात. त्यांच्या कुटुंबातील महिला शासनाच्या दृष्टीने लाडकी बहीण नाही असा अर्थ या योजनेच्या निकषातून निघताना दिसत आहे. दरम्यान या योजनेसाठी लागणार्‍या कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय ग्रामपंचायत मध्ये महिलांनी गर्दी होत आहे.

योजनेसाठी कोण ठरणार अपात्र..
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय घरात कोणी कर भरत असेल तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्त वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल. ट्रॅक्टर सोडून घरात जर चारचाकी असेल तर ही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातील व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी अपात्र ठरवणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...