spot_img
अहमदनगरसिद्धार्थनगर मधील हिंदू महिलांना मारहाण; आ. जगताप अक्रमक, म्हणाले, यापुढे गय केली..

सिद्धार्थनगर मधील हिंदू महिलांना मारहाण; आ. जगताप अक्रमक, म्हणाले, यापुढे गय केली..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सिद्धार्थनगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये काही जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात.काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते,अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे. हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन महिलांच्या तब्येतीची विचारपूस करत घटनेची माहिती घेत तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन बाकीचे आरोपी तातडीने अटक करून महिलांना झालेल्या मारहाणीनुसार ३०७ चे कलम लावण्याची मागणी केली आहे.सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांना झालेल्या मारहाणी बाबत आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत विचारपूस केली.

यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सिविल हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लालटाकी येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही आदल्या दिवशी घशाच्या त्रासाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. रुग्णांवर उपचारा दरम्यान दिरंगाई होते या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिनरी असून देखील रुग्णांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे.यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...