spot_img
अहमदनगरखटाखट पैसे देण्‍याचे आश्‍वासन देणारे पटापट पळून गेले! मंत्री विखे नेमकं काय...

खटाखट पैसे देण्‍याचे आश्‍वासन देणारे पटापट पळून गेले! मंत्री विखे नेमकं काय म्हणाले पहा..

spot_img

राहाता । नगर सहयाद्री:-
योजनांच्‍या यशस्‍वी अंमलबजावणीमुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार येणार आहे. लाडक्‍या बहीणी महायुती मधील भावांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभ्‍या राहणार असल्‍यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले आहेत. निवडणूकीच्‍या काळात खटाखट पैसे देण्‍याचे आश्‍वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून गेले असल्‍याचा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लगावला.

राहाता पंचायत समितीच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण माजीमंत्री आ.पंकजाताई मुंडे यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. या कार्यक्रमास आ.आशुतोष काळे, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा सहकारी बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्‍यासह विविध विभागांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

राहाता पंचायत समितीची इमारत आ.पंकजा मुंडे यांच्‍या सहकार्याने उभी राहीली असल्‍याचा गौरवपुर्ण उल्‍लेख करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, मी विरोधी पक्षनेता असतानाही राजकारण आड येवू न देता या इमारतीच्‍या कामाला निधीची उपलब्‍ध्‍ाता करुन दिली. याचे एकमेव कारण मुंडे आणि विखे परिवाराचा गेल्‍या अनेक वर्षांपासून असलेला ऋणानूबंध. स्‍व.खा.बाळासाहेब विखे पाटील आणि गोपीनाथ मुंडे यांची राजकारणा पलिकडे जावून मैत्री होती. दोघांच्‍याही राजकीय भूमिका आणि मत अतिशय स्‍पष्‍ट होते. दोघांनीही केलेल्‍या संघर्षाची त्‍यांना किंमतही मोजावी लागली पण ते त्‍यांच्‍या लढाईपासून मागे हटले नाही, याची आठवण करुन देत, या संघर्षमय विचारांचा वारसा पुढे घेवून जात पंकजाताईंनी आपले स्‍वत:चे कतृत्‍व आणि नेतृत्‍व राज्‍यात सिध्‍द करुन दाखविले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍यात महायुतीचे सरकार सर्व समाज घटकांसाठी योजनांच्‍या माध्‍यमातून काम करीत आहे. शिर्डी मतदार संघातील विकासाची प्रक्रीयाही वेगाने पुढे जात आहे. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या भागातील युवकांना रोजगार निर्माण करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपण ठेवले असून शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीमध्‍ये कार्यान्वित होणा-या डिफेन्‍स क्‍लस्‍टरचा प्रकल्‍पातून दोन हजार तरुणांना रोजगार देण्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल असे स्‍पष्‍ट करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, राहाता पंचायत समितीच्‍या प्रशासकीय इमारती बरोबरच शेजारीच असलेल्‍या राहाता पोलिस ठाण्‍याच्‍या कार्या‍लयीन व कर्मचा-यांच्‍या इमारतीसाठी शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

महायुती सरकारमुळेच या भागातील निळवंडे कालव्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागला. गोदावरी कालव्‍यांच्‍या नुतणीकरणासाठी १९१ कोटी रुपये शासनाने मंजुर केले असून, कालच्‍या मंत्रीमंडळ बैठकीतही कोकणाकडे वाहून जाणारे पाणी तुटीच्‍या असलेल्‍या गोदावरी खो-यात वळविण्‍यासाठी कराव्‍या लागणा-या आराखड्यास ६२ कोटी रुपये मंजुर केले असल्‍याची माहीती त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिली.

राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर येणार आहे. महाविकास आघाडी कडून केवळ दिशाभूल करण्‍याचे काम सुरु आहे. याला गावपातळीवरील कार्यकर्त्‍यांनी बळी न पडता तसेच कुरघोडीचे राजकारण न करता जशास तसे उत्‍तर द्या असे आवाहन करीत तुमच्‍या भरवश्‍यावरच मी राज्‍यात सक्षमपणे काम करीत असल्‍याने आता कार्यकर्त्‍यांनीही विकासाच्‍या मागे ठामपणे उभे राहावे.

माजी मंत्री आ.पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या की, ग्रामविकास मंत्री म्‍हणून काम करताना अनेक योजनांची अंमलबजावणी करता आली. राज्‍यात ९८ पंचायत समितींच्‍या इमारतींकरीता ४३० कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्‍ध करुन दिला. ३ लाख ७० हजार महिला बचत गट निर्माण करुन त्‍यांना ४ हजार २०० कोटी रुपयांचे अनुदान मंजुर करुन दिले. मुंडे साहेबांच्‍या प्रेरणेमुळेच राज्‍यात मुख्‍यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. सुमारे १४ हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्रामसडक येजनेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागाला मिळवून दिल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांची भाषणे झाली. प्रांरभी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर यांनी प्रास्‍ताविक केले.

विधान परिषदेवर निवड झाल्‍याबद्दल आ.पंकजा मुंडे यांचा नागरी सत्‍कार करण्‍यात आला. मुख्‍यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्‍या तरुणींना प्रातिनिधीक स्‍वरुपात नियुक्‍ती पत्र आणि महीला बचत गटांना अनुदानाचे धनादेश प्रदान करण्‍यात आले. या कार्यक्रमास तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला बचत गटांच्‍या सदस्‍या मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...