spot_img
अहमदनगर‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून या योजनेचा लाभ निकषांच्या आधारे देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता या योजनेविषयी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे परत घेणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.

खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार पैसे सरकार परत घेणार का असा आदिती तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. याविषयी बोलताना तटकरे यांनी, असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही. सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते.

त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड (परतावा अधिकारी) तयार करून देतील. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील.

योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम (नियमित परतावा प्रणाली) असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील. अशी माहिती त्यांनी दिली.

साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिला अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत....

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

बीड / नगर सह्याद्री - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पाय...

सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे 11 लाख वसूल; उपायुक्त म्हणाले, माफीचा लाभ घ्या,अन्यथा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत...

पाणीपट्टी वाढणारच…!; निर्णयावर प्रशासन ठाम

मध्यमार्ग काढण्याच्या हालचाली अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला, तरी...