spot_img
अहमदनगरयंदा वैरण भाव खाणार! निसर्गाचा लहरीपणा; पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

यंदा वैरण भाव खाणार! निसर्गाचा लहरीपणा; पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

spot_img

सुपा / नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती पट्ट्यात चालू वष पावसाने चांगली कृपादृष्टी दाखवूनही शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामीच राहणार आहे. गत वष खरिप हंगाम पूर्ण हा वाया गेला. उशिरा का होईना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. नदी नाले ओसंडून वाहू लागले. बळीराज्याची रब्बी हंगामासाठी लगबग सुरू झाली. शेतात असलेल्या मुग हे पीक उपळली असल्याने तोडता आले नाही. तर काही शेतकऱ्यांनी पिकांवर पाळ्या घातल्या व रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, सोयाबीन, कापूस, तुर, मका, वटाणा, गहू आदींची पेरणी करण्यात आली. तर पाणी मुबलक असल्याने जणावरांसाठी घासाचे बी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात उपळी तयार झाली. उपळी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. उपळी नंतर सावरत असतांनाच बळीराजा वातावरणाशी मोठा संघर्ष करताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना पोषक असे वातावरण नसल्याने या पिकावर रोगराईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने महागडे औषधे विकत घेऊन फवारण्या कराव्या लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. रोजच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, हरभरा, गहू ह्या पिकांना माव्यासह तुडतुडे, चिकटा, करप्या या रोगाने ग्रासले आहे. तर मका,तुर यावर लष्करी आळईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

कांदा उत्पादनात घट होणार!
तालुक्यातील सुपा, वाळवणे, आपधूप, वाघुंडे, हंगा, मुंगशी, म्हसणे, घाणेगाव, बाबुड, रूईछत्रपती, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे, जातेगाव आदी भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याला बाजारभाव मिळत असल्याने 20 ते 25 हजार रुपये पायलीने रोपे विकत घेऊन लागवड केली मात्र ढगाळ वातावरणामुळे हे पिक रोगराईने ग्रासले असून एकरी उत्पादनात मोठी घट होणार आहे.
– दिपक खंदारे, प्रगतशील शेतकरी

वैरण भाव खाणार!
सध्या दुधाला बाजारभाव मिळत नसल्याने गायांच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे. 30 हजार ते 60 हजारांपर्यंत गाईच्या किंमती आहेत. दुग्धव्यवसाय परीसरात मोठ्या प्रमाणात असल्याने चालू वष त्या तुलनेत वैरण (कडबा) उपलब्ध होणार नसल्यामुळे 1 हजारांपासून ते 2 हजार 500 रूपये विकणारा कडबा यावष 3 हजार 500 ते 4 हजारांपर्यंत शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागणार आहे.
– संजय पवार, प्रगतशील शेतकरी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...