spot_img
अहमदनगर...'ही' तर ' फ्लेक्स' लावत बनवाबनवी! आमदार थोरात यांचा विखे पिता पुत्रांना...

…’ही’ तर ‘ फ्लेक्स’ लावत बनवाबनवी! आमदार थोरात यांचा विखे पिता पुत्रांना खोचक टोला

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या बातम्या आल्या. या निर्णयाकडे सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जाऊ लागले. खासदार सुजय विखे यांनीही या निर्णयाचे क्रेडिट घेत जल्लोष केला. परंतु, त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, निर्यातबंदी उठवली नसल्याचे सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आले. यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही संधी साधत मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

कांदा निर्यातबंदी केली कशासाठी, कांद्याचे भाव वाढले. त्यावेळी निर्यातबंदी करून कांद्याचे भाव कोसळले. शेतकर्‍यांच्या लाभाऐवजी त्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला. यांच्यातील श्रेयवाद फार मोठा आहे. कांदा निर्यात बंदीबाबत मोठमोठे फ्लेस बॅनर लावले गेले प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठलीच नाही त्यामुळे सध्या असा हा बनवाबनवीचा कार्यक्रम चाललेला आहे, अशा शब्दांत त्यांनी विखेंना खोचक टोला लगावला.थोरात यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ज्या पद्धतीने इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली जाते त्यानुसार भाजपातील लोकांनाच आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यसभेवर सहापैकी चारजण आमच्याच विचारांचे पाठवल्याने भाजपातील मूळ कार्यकर्त्यांना आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. सध्याचे सरकार हे गुजरातचे नेते जे केंद्रामध्ये आहेत त्यांच्या हुकुमावर चालते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रापेक्षा गुजरात महत्त्वाचा वाटतो. आज महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे जात आहेत आता महानंद प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे. दिल्लीत ठरले जाते महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी हे करताना दिसत आहेत अशी टीका थोरात यांनी केली.

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलं आहे याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी तुतारी’चा आवाज जोरदार येणार यात शंका नाही. आजच शेवटच्या घटकापर्यंत तुतारी पोहोचलेली आहे. शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीचे योगदान जनता विसरणार नाही. तत्व आणि विचारांशी बांधिलकी त्यांनी ठेवलेली आहे, असे थोरात म्हणाले.

दक्षिणेचे वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल नगर दक्षिण मतदार संघाचे वातावरण भाजपासाठी अनुकूल नसून महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचे दिसते. मंत्री विखेंनी त्यांच्या खात्याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. २२ कोटींचा महसूल वाळू आणि गौण खनिजामधून मिळत होता. आता त्यांना व्यक्तिगत टीका करण्याचे कारण नव्हते. विचारांचा विरोध विचारांनी करणं महत्त्वाचं असतं परंतु मध्यंतरी मी भाषण केले होते ते त्यांच्या जिव्हारी लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; कोण अडकलं जाळ्यात, वाचा सविस्तर

अव्वल कारकून चार लाखांच्या लाचेच्या जाळ्यात अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रस्त्याच्या कामाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी...

शिवसेनेला 32 आजी-माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र! भाजपा-एकनाथ शिंदे सेना यापैकी एक पर्याय निवडला जाणार

जनाधार नसलेल्यांच्या आरोपांनी वैतागले पदाधिकारी | गुप्त बैठकीत झाला निर्णय | भाजपा-एकनाथ शिंदे सेना...

राज्यात कुठे-कुठे फेरमतमोजणी? निवडणुक आयोगाकडून कुणाला मिळाला दिलासा…

नाशिक | नगर सह्याद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम...

अहिल्यानगर: बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा! कापड बाजारातील अतिक्रमण हटणार का?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या...