spot_img
महाराष्ट्रशिवसेनेच्या अधिवेशनात झाले 'हे' ठराव ! मोदींना PM करण्याची मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांची शपथ

शिवसेनेच्या अधिवेशनात झाले ‘हे’ ठराव ! मोदींना PM करण्याची मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिकांची शपथ

spot_img

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूर मध्ये शिवसेनेचे महाधिवेशन आज सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे अधिवेशन पार पडत आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून याठिकाणी शिवसैनिकांनी हजेरी लावली.

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडली. त्यानंतर शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे ४८ उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली.

आगामी काळात निवडणुकांमध्ये यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, तसेच राज्यातील हजारो पदाधिकारीही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे, यासाठी लागणारे सर्वाधिकार पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत केला गेला.

शिवसेनेच्या अधिवेशात झालेले ठराव खालीलप्रमाणे
– पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकी‍र्दीबाबत अभिनंदन.
– देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन.
– राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन
– लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात येत आहेत.
– शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...