spot_img
अहमदनगर'हे' राजकारण लोकशाहीला घातक! बाळासाहेब थोरात सरकारवर बरसले..

‘हे’ राजकारण लोकशाहीला घातक! बाळासाहेब थोरात सरकारवर बरसले..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जगातील देश विविध पद्धतीने विकास साधत आहेत. अशावेळी आपल्या देशात दंगली होणे, तणाव निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. समाजात तणाव निर्माण होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही राज्यकर्त्याच्या काळात समाज आनंदी असला पाहिजे. राज्यात दंगली होतायेत हे अभिमानाने सांगणार आहात का? अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

अहिल्यानगर येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उपस्थित होते. दिशा सालियान प्रकरणातून राजकारणाचा स्तर किती खाली सरला आहे, याचे मूर्तीमंत उदाहरण दिसून येते. राजकारणात मतभेद असतात पण तत्त्वाचे असावेत. एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेत असाल तर हे राजकारण लोकशाहीला घातक आहे. ठाकरे कुटुंबावर दहशत करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा पुन्हा काढले जात आहे, अशी टीका थोरात यांनी यावेळी केली.

यावेळी थोरात म्हणाले, जगातील देश विविध पद्धतीने विकास साधत आहेत. अशावेळी आपल्या देशात दंगली होणे, तणाव निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. समाजात तणाव निर्माण होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही राज्यकर्त्याच्य काळात समाज आनंदी असला पाहिजे. राज्यात दंगली होतेय हे अभिमानाने सांगणार आहात का? सरकारने राजधर्म पाळल पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराची जात, धर्म पाहिली जाऊ नये. गुन्हेगाराची एकच जात गुन्हेगारी त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु यामध्ये भेदभाव केल जाऊ नये. राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही थोरात म्हणाले. राज्यातील संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाही. सरकार म्हणून निराधार व्यक्तींना काही देऊ शकत नसाल तर तुम्ही काम करण्यास योग्य नाही. तुम्ही निराधारांचे पालनकर्ते नाहीत, अशी स्वतःची अर्थव्यवस्था करुन ठेवली. त्यामुळे कोणत्याही योजनेल पैसे नाहीत म्हणून सांगण्याचा अधिकार सरकारला नाही, अशी टीका थोरात यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला आदित्य ठाकरे यांचा काय संबंध, पहा प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

दिशाच्या वडिलांची याचिका हायकोर्टाने स्वीकारली; २ एप्रिलला होणार सुनावणी मुंबई / नगर सह्याद्री : दिशा सालियनची...

कमिशनरसाहेब, टीपीमधील नॉन टेक्नीकल स्टाफ माती खातोय!

नगर शहराची वाट लावणाऱ्या नगररचना विभागात वैभव जोशी, संजय चव्हाण यांना कोण अन्‌‍ कशासाठी...

चुकीला माफी नाहीच! दंगलखोरांना सोडणार नाही, बुलडोझर फिरवणार, CM फडणवीसांचा कडक इशारा

नागपूर / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगलखोरांना सज्जड दम दिला....

उद्योजक परदेशी खून प्रकरणात मोठी अपडेट; ‘त्यांना’ सुपारी दिली..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- व्यापारी दिपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचे दहा कोटींसाठी अपहरण...