spot_img
अहमदनगर...हे तर राजकीय भांडण आणि तेल ओतण्याचे काम; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

…हे तर राजकीय भांडण आणि तेल ओतण्याचे काम; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

spot_img

जामखेड | नगर सह्याद्री
सध्या महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई सुरू आहे. जर ही लढाई अशीच राहिली तर मराठा समाज हा ओबीसीला मतदान करणार नाही. ओबीसी समाज हा मराठा समाजाला मतदान देणार नाही. हे राजकीय भांडण आहे. मात्र ओबीसी व मराठा समाजात काहीजण तेल ओतण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै रोजी मुंबई (दादर) येथील चैत्यभूमी येथून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ३० जुलै रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आली होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अ‍ॅड.अरुण जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, बापूसाहेब ओव्हळ, तालुका अध्यक्ष अतिश पारवे, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, मुक्तार सय्यद, नय्युमभाई सुभेदार, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अशोक आव्हाड, सुरेखा सदाफुले, सुरेखा रत्नाकर सदाफुले, अरुणा सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, लहुशेठ पवार, योगेश सदाफुले, मंगेश घोडेस्वार, सचिन भिंगारदिवे, अजिनाथ शिंदे, विशाल पवार, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राजू शिंदे, रेश्मा बागवान, भिमराव चव्हाण, मुकूंद घायतडक, ऋषिकेश गायकवाड, विकास गोपाळघरे, अशोक गंगावणे, बाजीराव गंगावणे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

दरम्यान या रॅलीची सांगता ७ ऑगस्ट रोजी छ.संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होणार आहे. माजी पंतप्रधान व्हि.पी.सिंह यांनी याच दिवशी मंडल लागू करून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला म्हणून हा दिवस प्रत्येक वर्षी ओबीसी आरक्षण दिन म्हणून साजरा केला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. ही यात्रा चोंडी येथे गेल्यानंतर तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून तेथे संवाद सभा संपन्न झाली. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात राजकीय धुळवड! नाना पटोलेंची अजित पवार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई । नगर सहयाद्री:- देशात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच...

गाळे भाडे वसुलीसाठी मनपाचा ऍक्शन प्लॅन; विशेष ‘स्क्वॉड’ मैदानात, आयुक्त म्हणाले आता…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : महापालिकेच्या करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे....

दूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी...

नगरमध्ये तलवारीने सपासप वार; दोन गटात ‘या’ ठिकाणी राडा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत...