spot_img
अहमदनगरPolitics News :..हीच तर विरोधकांची डोकेदुखी! भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे काय म्हणाले?...

Politics News :..हीच तर विरोधकांची डोकेदुखी! भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे काय म्हणाले? वाचा..

spot_img

Politics News: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वाटचाल करत असताना आलेला प्रशासकीय कामांतील अनुभव व पक्षीय नेतृत्वांच्या सहकार्यामुळे तालुक्यात संघटनात्मक पदाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ( Parner Taluka) राजकीय, सामाजिक क्षेत्रात माझा वाढत असलेला प्रभाव विरोधकांची डोकेदुखी वाढवत असल्याचे मत महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे (Vishwanath Korde) यांनी रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी जामगाव व काळकूप येथील प्रत्येकी ३० लक्ष अशा एकूण ६० लक्ष रुपये प्रशासकीय किमत असलेल्या रस्ता कामांच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

पारनेर तालूक्यातील जामगाव येथील (शिंदे वस्ती) जामगाव ते पाडळी तर्फे कान्हूर तर काळकुप येथील जामगाव ते कदमवस्ती (काळकुप) या रस्ता कामांचे गट ब ३०५४ -२४१९ रस्ते व पूल दुरुस्ती या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या रस्ता कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप नेते विश्वनाथ कोरडे बोलत होते.

यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते भाजपा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषजी दुधाडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकासजी रोहकले, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, युवा मोर्चा सर चिटणीस सोपान मुंजाळ, जामगावच्या सरपंच पुष्पा बाळासाहेब माळी, काळकुप गावचे उपसरपंच आनंदा भुजबळ, मा.सरपंच दिनकर सोबले, चेअरमन बाळासाहेब सोबले, ग्रामपंचायत सदस्य आप्पा मेहेर, प्रसाद मेहेर, समीर मांडरे, संजय शिंदे, दगडू खाडे, पांडुरंग शेठ हिलाळ, दिपक क्षीरसागर, मनोज शिंदे, जालिंदर खाडे यांसह जामगाव, काळकुप व परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...