निघोज। नगर सहयाद्री:-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हजारो विकासयोजना राबवल्या जात आहेत. विरोधक फक्त पुड्या सोडण्याचे काम करीत असून हजारो घरकुल त्यांनी आणल्याची फेकवार्ता पसरत आहे. विरोधकांनी गेली पाच वर्षात फक्त दमबाजी करीत मतदारसंघात दहशत निर्माण केली असल्याची टीका भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी विरोधकांवर केली.
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामस्थांच्या वतीने आ. काशिनाथ दाते यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे होते. यावेळी आमदार दाते सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई दाते यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. गावचे दैवत असलेल्या हनुमान मंदीरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर सुमनताई यांची गुळ तुला व वही तुला करीत नवसपूर्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, ज्येष्ठ नेते प्रभाकर कवाद, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सरपंच पंकज कारखीले, सचिन पाटील वराळ, विक्रम कळमकर, बबुशा आण्णा वरखडे , रोहिदास लामखडे, सावकार लामखडे, मेश वरखडे, सुषमा रावडे , सरपंच भिवसेन येवले, खंडू म्हस्के, भाऊसाहेब डेरे, प्रभाकर डेरे, डॉ. उत्तमराव थोरात, आर एम कापसे, सरपंच कोमल भंडारी, सरपंच पांडुरंग येवले, सरपंच भास्करराव उचाळे, सुधामती कवाद, राधाताई कापसे, अर्चना गिरी, दिलीप दाते, सखाराम कवडे, शिवराज कदम, सिताभाऊ कवडे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावचे ज्येष्ठ कारभारी रखमाजी कापसे सर यांनी प्रास्ताविक भाषनात विकासकामांची माहिती देत आ. दाते सर यांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगितले. शिवराज कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सिताभाऊ कवडे यांनी आभार मानले. शिवगणेश प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील;आ. काशिनाथ दाते
माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे घाटमाथ्यावरचे पाणी आपल्या भागात आणण्याचे स्वप्नपूर्ती करण्याचे काम आपण प्रामुख्याने करणार आहोत. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा विकास होण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहोंत. गेली चाळीस वर्षात आपण जे समाजकारण केले त्याची नोंद घेत जनतेने आपल्याला निवडून दिले आहे याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही. येत्या पाच वर्षांत रस्ते, आरोग्य, विज, जलसिंचन हे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लागतील व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पाठबळाने व आशिर्वादाने मतदारसंघाघा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी खात्री आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली.
सासुरवाडीत आ. दाते यांचा थाटामाटात पाहुणचार
आमदार काशिनाथ दाते सर व सुमनताई यांच्या लग्नाला ५१ वर्षं पूर्ण झाली ५१ वर्षानंतर सुध्दा सासुरवाडीचा पाहुणचार घेण्यासाठी आलेल्या जावई आमदार काशिनाथ दाते सर व लेक सुमनताई यांच्या पाहुणचारात पाबळ ग्रामस्थांनी कुठेही कसर केली नाही. भव्व दिव्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, डी जे च्या तालावर नाचणारी ज्येष्ठ व युवा मंडळी, अगदी लग्नाच थाट करणारी ही मिरवणूक पाहून पुन्हा ५१ वर्षांनंतर आमदार काशिनाथ दाते सर व सुमनताई यांचे लग्न गावकरी पुन्हा लावतात की काय अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती.