अहमदनगर। नगर सहयाद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात वेशांतर करून बसलेले आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
कबिर उंबऱ्या काळे (वय २२), सार्थक ऊर्फ सिव्हील ऊर्फ लंगड्या सगड्या काळे (वय २१), दोन्ही रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा, साईनाथ तुकाराम जाधव (वय ३३), रा. घोसपुरी, ता. श्रीगोंदा असे आरोपींचे नाव असून मिथुन उंबऱ्या काळे, रा. सुरेगाव, बबुशा चिंगळ्या काळे (रा. वांगदी, ता. श्रीगोंदा) यांनी मदत केली असून ते सध्या फरार आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव कौंडा येथे शेत वस्तीवरील घरात घुसून चाकुचा धाक दाखवून जबरी चोरीकेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बाळासाहेब रंगनाथ केदारे यांनी फिर्याद दिली होती.
या जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने समांतर तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा कबीर काळे रा, सुरेगाव, ता. श्रीगोंदा याने अन्य साथीदारासह केला असल्याचे उघड केले.
दरम्यान आरोपी सध्या ब्रम्हगिरी, त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार पोलीसांच्या पथकाने पथकाने वेशांतर करुन ब्रम्हगिरी पर्वतावरील आश्रमात तिन दिवस मुक्कामी राहत आरोपींना जेरबंद केले.