अहमदनगर। नगर सहयाद्री
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील ११५ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे अनेकांना भोवले आहे.
जिल्हा पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकुण ११५ जण सापडले.त्यांची तपासणीकरून त्यांच्यावर संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरल्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी नगर शहरासह जिल्ह्यातील बार आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती.
नगर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि मुख्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्तठेवण्यात आला होता. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत ३९ डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
प्रभारी अधिकाऱ्यांनी आपआपल्या हद्दीत ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहन चालकांची पोलिसांनी ब्रेध नालायझर तपासणी केली असून त्यांत मद्यपान करून वाहन चालवणान्या ११५ चाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.