spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगेंच्या उपोषणाच तिसरा दिवस; दोन जणांची तब्येत खालावली

मनोज जरांगेंच्या उपोषणाच तिसरा दिवस; दोन जणांची तब्येत खालावली

spot_img

अंतरवाली सराटी | नगर सह्याद्री:-
अंतरवाली सराटीतील दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी आंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासह इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्यभरातून आलेले काही मराठा बांधव आणि भगिनी देखील आमरण उपोषण साठी बसले आहे. तिसऱ्या दिवशी एका महिला उपोषणकर्त्याची तब्येत खालवली आहे. येरमाळा येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे यांची तब्येत खालावली आहे.

दरम्यान या दोन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल आहे.मागील दोन दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंबडच्या तहसीलदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं.

आमच्या पोरांना न्याय द्या
देशमुख कुटुंबाने उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मीच या बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झालं. त्यांच्या व्हायला नको. आम्ही खुनशी नाही आमची कुणाला ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्ही जातीयवादी नाही. आम्ही लोकांवर डुक धरत नाही आमची कुणाला ना नाही, सगळं देश इथे येऊन गेला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना दिली. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे, हे फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....