spot_img
अहमदनगरहा पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम समजा...; माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियातून...

हा पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम समजा…; माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियातून व्यक्त केल्या भावना

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
काही तांत्रिक अडचणींमुळे मला आगामी विधानसभा निवडणूक लढविता येत नाही. तसेच माजी उपमहापौर सौ. सुवर्णा कोतकर यांनाही काही तांत्रिक अडचणींमुळे निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याने आम्ही दोघेही नगरकरांच्या सेवेपासून वंचित राहिलो आहोत. परंतु नगरकरांनो कोतकर कुटुंबाचा पुढील काळ तुमच्या सेवेसाठीच असेल असे भावनाप्रधान मत माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियातून व्यक्त केले आहे.

संदीप कोतकर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे, की प्रिय नगरकरांनो, गेल्या महिनाभरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष आहेच. बर्‍याच राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक घडामोडी घडून आल्या. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून एक सक्षम पर्याय नगरकरांना देण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं. नगरकरांचा विकास हा कोतकर परिवाराचा नेहमीच अजेंडा राहिलेला आहे. त्यातून माझ्या उमेदवारीचा विचार पुढे आला. परंतु, त्यात येत असलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते शय झाले नाही. त्यावर कार्यकर्ते आणि वरिष्ठांच्या आग्रहाने माजी उपमहापौर सौ. सुवर्णा संदीप कोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मोठ्या ताकदीने जिंकण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी लढण्याची तयारी सुरू केली होती. कार्यकर्ते, जिवाभावाचे मित्र, सहकारी ज्यांचे योगदान मी कधीच विसरू शकत नाही. माझा भाऊ सचिन आबा आणि माझे पूर्ण कुटुंब यांनी प्रचंड परिश्रम केले. हे सगळं करीत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यांना तोंड देत जनसामान्यांच्या भेटीगाठी सुरू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे सौ. सुवर्णा यांचाही अर्ज आज मागे घ्यावा लागला.

ही माघार घेत असताना मनात एक निराशा आहे. परंतु हा शेवट नाही. ही सुरुवात आहे एक नव्या पर्वाची, गेली अनेक वर्षे वनवासात राहिलेले कोतकर कुटुंब पुन्हा जनसामान्यांच्या सेवेत येण्याची. इथून मागचा काळ तुमच्या साठीच होता. इथून पुढचा काळही तुमच्या सेवेसाठीच असेल. आपली लढाई ही नगरकरांच्या विकासासाठी होती आणि राहील, ती संधी आपण आम्हाला देत रहाल ही खात्री आहे, असे संदीप कोतकर यांनी म्हटले आहे.  छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… या काव्य ओळीद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व सोबत आहोत, सोबत राहू असे फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...